Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॅरारो इंडिया लिमिटेड चौथ्या तिमाहीचे आणि आर्थिक वर्ष २०२६ चे एकत्रित...

कॅरारो इंडिया लिमिटेड चौथ्या तिमाहीचे आणि आर्थिक वर्ष २०२६ चे एकत्रित निकाल –

 

आर्थिक वर्ष २०२६ मध्ये एकूण उत्पन्न २२,८४० दशलक्ष रुपये राहिले; यात वार्षिक आधारावर २५ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

आर्थिक वर्ष २०२६ चा ईबीआयटीडीए (इतर उत्पन्नासह) २,४७५ दशलक्ष रुपये राहिला; १०.८ टक्‍के मार्जिनसह (आर्थिक वर्ष २०२५ मधील १०.२ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत) वार्षिक आधारावर ३३ टक्‍क्‍यांची वाढ नोंदवली गेली.

आर्थिक वर्ष २०२६ चा करोत्तर नफा (पीएटी) १,३०६* दशलक्ष रुपये राहिला; ५.७ टक्‍के मार्जिनसह (आर्थिक वर्ष २०२५ मधील ४.८ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत) वार्षिक आधारावर ४८ टक्‍क्‍यांची वाढ झाली.

पुणे – २६ मे २०२६: कॅरारो इंडिया लिमिटेड या अॅक्सल्स, ट्रान्समिशन सिस्टम्स, गिअर्स आणि इतर संबंधित घटकांसाठी स्वतंत्र टियर-१ सोल्यूशन प्रदाता कंपनीने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि पूर्ण वर्षाचे आपले लेखापरिक्षित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.

तपशील (दशलक्ष रूपये)

आर्थिक वर्ष २०२६ ची चौथी तिमाही

आर्थिक वर्ष २०२५ ची चौथी तिमाही

वार्षिक वाढ

 

 

एकूण उत्‍पन्न

६,१४२

४,४७९

३७ टक्‍के

ईबीआयटीडीए (इतर उत्‍पन्नासह)

७१०

४८९

४५ टक्‍के

ईबीआयटीडीए मार्जिन (टक्‍के)

११.६ टक्‍के

१०.९ टक्‍के

 

 

करोत्तर नफा (पीएटी)

४१७

२३७

७६ टक्‍के

पीएटी मार्जिन (टक्‍के)

६.८ टक्‍के

५.३ टक्‍के

 

 

 

आर्थिक वैशिष्‍ट्ये:

आर्थिक वर्ष २०२६

आर्थिक वर्ष २०२५

वार्षिक वाढ

२२,८४०

१८,२३४

२५ टक्‍के

२,४७५

१,८६४

३३ टक्‍के

१०.८ टक्‍के

१०.२ टक्‍के

 

 

१,३०६

८८१

४८ टक्‍के

५.७ टक्‍के

४.८ टक्‍के

 

 

 

 

 

 

 

*यात ९५ दशलक्ष रुपयांच्या नवीन लेबर कोडच्या (कामगार कायदा) प्रभावाचा समावेश आहे.

कार्यात्मक वैशिष्ट्ये:

तपशील (दशलक्ष रूपये)

आर्थिक वर्ष २०२६ ची चौथी तिमाही

आर्थिक वर्ष २०२५ ची चौथी तिमाही

वार्षिक वाढ

आर्थिक वर्ष २०२६

आर्थिक वर्ष २०२५

वार्षिक वाढ

कृषी उपकरणे

२,७८४

२,०३६

३७ टक्‍के

१०,१९२

८,५६५

१९ टक्‍के

बांधकाम उपकरणे

२,६१३

१,९२८

३६ टक्‍के

९,८३७

७,४९१

३१ टक्‍के

इतर

६७०

४७९

४० टक्‍के

२,५२६

२,०१९

२५ टक्‍के

एकूण

६,०६७

४,४४३

३७ टक्‍के

२२,५५५

१८,०७६

२५ टक्‍के

 

 

तपशील (दशलक्ष रूपये)

आर्थिक वर्ष २०२६ ची चौथी तिमाही

आर्थिक वर्ष २०२५ ची चौथी तिमाही

वार्षिक वाढ

आर्थिक वर्ष २०२६

आर्थिक वर्ष २०२५

वार्षिक वाढ

देशांतर्गत

३,९६८

३,१९६

२४ टक्‍के

१४,४३०

१२,१५५

१९ टक्‍के

निर्यात

२,०९९

१,२४६

६८ टक्‍के

८,१२५

५,९२१

३७ टक्‍के

एकूण

६,०६७

४,४४३

३७ टक्‍के

२२,५५५

१८,०७६

२५ टक्‍के

 

 

इतर प्रमुख व्यावसायिक ठळक घडामोडी (आर्थिक वर्ष २०२६)

टेले-बूम हँडलर (टीबीएच): बांधकाम उपकरणे:

एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ओईएमसाठी टेले बूम हँडलर्स (टीबीएच) अॅक्सल्सच्या नवीन श्रेणीच्या उत्पादनातील वाढ पुनरावलोकन कालावधीत सुरू राहिली, ज्यामध्ये येत्या तिमाहींमध्ये सातत्यपूर्ण वाढीची चांगली गती आणि भक्कम शक्यता दिसून येत आहे.

टेले बूम हँडलर्स (टीबीएच) प्रकारच्या अॅक्सल्ससाठी देशांतर्गत ग्राहकासोबतचे (वैश्विक आणि भारतीय) नवीन प्रकल्प चांगल्या प्रगतीपथावर असून ते ठरलेल्या वेळेनुसार सुरू आहेत.

बॅकहो लोडर (बीएचएल) ट्रान्समिशन आणि अॅक्सल्स:

आर्थिक वर्ष २०२६ दरम्यान भारतीय बांधकाम उपकरणे (सीई) ग्राहकांना ड्रायव्हलाईन्सच्या विक्रीत अंदाजे ९ टक्‍के वाढ झाली आहे, तर याच कालावधीत एकूण बांधकाम उपकरणे (सीई) बाजारपेठेत २ टक्‍के घट झाली आहे.

देशांतर्गत बाजारपेठेत बीएचएल ग्राहकांना ड्रायव्हलाईन्सच्या विक्रीत आर्थिक वर्ष २०२६ मध्ये सकारात्मक वाढ नोंदवली गेली, तर व्यापक बाजारपेठेत मात्र सुमारे १० टक्‍के घसरण झाली होती.

देशांतर्गत बाजारपेठेतील घसरण असूनही, निर्यातीमधील वाढीने कंपनीच्या एकंदरीत कामगिरीला मजबूत पाठबळ दिले.

इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (अभियांत्रिकी सेवा) व्यवसाय:

उच्च एचपी(हॉर्सपावर) आणि प्रगत तंत्रज्ञान संरचनेसाठी अनेक चौकश्या प्राप्त होत आहेत.

ई-ट्रान्समिशनच्या औद्योगिकीकरण आणि पुरवठ्यासाठी मोंट्रा इलेक्ट्रिक (टीआयसीएमपीएल) सोबत १७.५ कोटी रुपयांचा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस करार केला आहे. हा प्रकल्प चांगल्या प्रगतीपथावर असून, क्षेत्रीय प्रमाणीकरणासाठी ट्रान्समिशन पुरवण्याचा प्रोटोटाइप (प्रतिकृती) आदेश प्राप्त झाला आहे.

इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी इतर एका ग्राहकासोबत सुरू असलेली चर्चा देखील सकारात्मक दिशेने पुढे जात आहे.

अतिरिक्त इंजिनिअरिंग सर्व्हिसेस व्यवसाय मिळवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. या विभागाकडून मिळणाऱ्या महसुलाचे योगदान वर्षानुवर्षे वाढेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे..

देशांतर्गत एजी (कृषी) ४डब्ल्यूडी अॅक्सल आणि गिअर्स व्यवसाय अपडेट:

जीएसटीमधील कपातीनंतर २डब्ल्यूडीवरून ४डब्ल्यूडी ट्रॅक्टर्सकडे जाण्याचा कल वेगवान झाला आहे, ज्यामुळे जीएसटी-पूर्व २डब्ल्यूडी ट्रॅक्टर्सची किंमत आणि जीएसटी-नंतरच्या ४डब्ल्यूडी मॉडेल्सची किंमत जवळपास सारखीच झाली आहे. परिणामी, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये देशांतर्गत ४डब्ल्यूडी अॅक्सल बाजारपेठेत मजबूत महसूल वाढ दिसून आली, ज्यामध्ये ४डब्ल्यूडी ट्रॅक्टर्सकडील कल एकूण बाजारपेठेतील वाढीपेक्षा अधिक वेगवान होता. याला प्रतिसाद म्हणून, सीआयएल येत्या काही वर्षांत अपेक्षित असणाऱ्या मागणीतील वाढ पूर्ण करण्यासाठी आपली क्षमता वाढवत आहे.

गिअर्स व्यवसायामध्ये, आर्थिक वर्ष २०२८ पासून लागू होणाऱ्या बुल गिअर्ससाठी एका मोठ्या ओईएमकडून अंदाजे १५ कोटी रुपये प्रति वर्ष मूल्याचे बिझनेस नॉमिनेशन (व्यवसाय कंत्राट) मिळवले आहे. कंपनी इतर दोन नवीन ग्राहक/प्रकल्पांवर देखील काम करत आहे.

आर्थिक वर्ष २०२६ दरम्यान गिअर्स व्यवसाय संथ राहिला. पण, हा व्यवसाय मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, ज्यामुळे आगामी तिमाहींमध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा होण्यास मदत मिळणे अपेक्षित आहे.

कृषी उच्च एचपी ट्रान्समिशन:

निर्यात बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर येत आहे, ज्याचा उच्च एचपी ट्रॅक्टर्ससाठीच्या ट्रान्समिशनच्या खरेदीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

एका आघाडीच्या ट्रॅक्टर ओईएमनेनोव्हेंबर २०२५ मध्ये जर्मनीतील हॅनोव्हर येथे आयोजित अॅग्रिटेक्निका प्रदर्शनात कॅरारोच्या उच्च एचपी ड्रायव्हलाईनने सुसज्ज असलेला ट्रॅक्टर प्रदर्शित केला होता.

कॅरारो ट्रॅक्टर्स, तुर्कीमधील एक ग्राहक आणि भारतातील ग्राहकांसोबतचे उच्च एचपी ट्रॅक्टर ट्रान्समिशन प्रकल्प चांगल्या प्रगतीपथावर आहेत. तुर्कीमधील ग्राहकासाठी एसओपी आर्थिक वर्ष २०२७ मध्ये अपेक्षित आहे, तर भारतीय ग्राहकासाठी एसओपी आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत अपेक्षित आहे.

निर्यात व्यवसाय अपडेट: (प्रत्‍यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही):

मुख्यत्वे बांधकाम उपकरणांमधील, विशेषतः टीबीएच आणि बीएचएल निर्यातीमधील सातत्यपूर्ण गतीमुळे निर्यातीने वार्षिक आधारावर ३७ टक्‍क्‍यांची मजबूत वाढ नोंदवली आहे.

भारतातील ओईएम्सद्वारे बांधकाम उपकरणांच्या निर्यातीला चांगली गती मिळत राहिली. यामुळे सीआयएलच्या निर्यात व्यवसायातील वाढीला पाठबळ मिळाले.

कृषी ड्रायव्हलाईन्सची अप्रत्यक्ष निर्यात संथ राहिली असली, तरी मजबूत देशांतर्गत मागणीमुळे आमच्या एकूण विक्रीच्या प्रमाणाचा आलेख कायम राखण्यास मदत झाली.

कॅपेक्स (भांडवली खर्च):

आर्थिक वर्ष २०२६ मध्ये, नवीन टेलिस्कोपिक हँडलरच्या अॅक्सल उत्पादनाला, कृषी वापरासाठीच्या उच्च-कामगिरीच्या नवीन ट्रान्समिशन श्रेणीला पाठबळ देण्यासाठी आणि आर्थिक वर्ष २०२६ च्या विक्रीसाठी वाढीव क्षमता प्रदान करण्यासाठी ४१७ दशलक्ष रुपयांचा भांडवली खर्च करण्यात आला आहे.

लाभांश:

संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२६ साठी प्रति इक्विटी शेअर ६.७५ रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे, ज्यामुळे अंदाजे ३० टक्‍के पेआउट होईल. हा लाभांश आगामी वार्षिक सार्वत्रिक बैठकमध्ये भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन असेल.

प्रस्तावित लाभांशामधून कंपनीची मजबूत आर्थिक कामगिरी, उत्तम कॅश फ्लो निर्मिती आणि भविष्यातील विकास उपक्रमांना पाठबळ देतानाच भागधारकांना शाश्वत मूल्य प्रदान करण्याप्रती असलेली निरंतर कटिबद्धता दिसून येते.

या निकालांबाबत मत व्‍यक्त करत कॅरारो इंडिया लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. बालाजी गोपालन म्हणाले,

आर्थिक वर्ष २०२६ च्या कामगिरीचा आढावा

“आर्थिक वर्ष २०२६ हे कॅरारो इंडियासाठी एक मजबूत आणि उत्साहवर्धक वर्ष राहिले आहे. कंपनीने देशांतर्गत आणि निर्यात अशा दोन्ही बाजारपेठांमध्ये चांगली वाढ नोंदवली आहे, तसेच वर्षादरम्यान जाहीर केलेल्या मार्गदर्शनानुसार ईबीआयटीडीए नफा मिळवला आहे. प्रामुख्याने कृषी वाहन क्षेत्रात देशांतर्गत बाजारपेठेतील सातत्यपूर्ण मागणी आणि बांधकाम उपकरणे क्षेत्राच्या नेतृत्वाखालील मजबूत निर्यात गतीमुळे कामकाजातून मिळणारा महसूल वार्षिक आधारावर २५ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. देशांतर्गत महसुलात वार्षिक आधारावर १९ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे, तर निर्यात वार्षिक आधारावर ३७ टक्‍क्‍यांनी वाढली आहे.

या वर्षात नफाक्षमतेमध्ये लक्षणीय सुधारणा झाली असून, ईबीआयटीडीए वार्षिक आधारावर ३३ टक्‍के आणि करोत्तर नफा (पीएटी) वार्षिक आधारावर ४८ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. वर्षादरम्यान प्रॉडक्ट मिक्समध्ये (उत्पादन श्रेणी) बदल होऊनही, ऑपरेटिंग लेव्हरेज, शिस्तबद्ध खर्च व्यवस्थापन आणि अंमलबजावणीतील कार्यक्षमतेमुळे ईबीआयटीडीए मार्जिन आर्थिक वर्ष २०२५ मधील १०.२ टक्‍क्‍यांवरून वाढून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १०.८ टक्‍के झाले आहे.

जीएसटीमुळे २डब्ल्यूडी आणि ४डब्ल्यूडी ट्रॅक्टर्समधील किमतींमधील फरक कमी झाल्यानंतर २डब्ल्यूडीवरून ४डब्ल्यूडी ट्रॅक्टर्सकडे जाण्याचा कल वेगवान झाला आहे, ज्याने देशांतर्गत कृषी व्यवसायातील मजबूत गती कायम राखण्यास मदत केली. या रचनात्मक बदलामुळे आणि ग्राहकांच्या मजबूत मागणीमुळे देशांतर्गत ४डब्ल्यूडी अॅक्सल बाजारपेठेत दमदार वाढ झाली असून, ४डब्ल्यूडी ट्रॅक्टरमधील वाढीने एकूण बाजारपेठेतील वाढीला मागे टाकले आहे. अपेक्षेनुसार वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी, आम्ही आगामी वर्षांतील वाढीला पाठबळ देण्याच्या दृष्टीने आपली क्षमता वाढवत आहोत.

कामकाज आणि बांधकाम उपकरणांमधील, विशेषतः टीबीएच आणि बीएचएलच्या निर्यातीमधील सातत्यपूर्ण गतीमुळे निर्यात हा प्रगतीचा एक प्रमुख चालक ठरला आहे. एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ओईएमसाठी टेले बूम हँडलर (टीबीएच) अॅक्सल्सच्या नवीन श्रेणीच्या उत्पादनातील वाढ या वर्षात सुरू राहिली, ज्यामध्ये सातत्यपूर्ण वाढीची चांगली गती आणि स्पष्ट शक्यता दिसून येत आहे. उच्च एचपी ट्रॅक्टर्ससाठीची निर्यात बाजारपेठ देखील हळूहळू पूर्वपदावर येत आहे, ज्याचा आगामी काळात ट्रान्समिशनच्या खरेदीवर सकारात्मक परिणाम होणे अपेक्षित आहे.”

आमच्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (अभियांत्रिकी सेवा) व्यवसायाने आपली पकड मजबूत करणे सुरू ठेवले असून, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १०० दशलक्ष रुपयांच्या महसुलाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, आम्हाला उच्च एचपी आणि प्रगत तंत्रज्ञान संरचनेसाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात चौकश्या प्राप्त होत आहेत. हे आमच्या क्षमतांवरील बाजारपेठेचा वाढता विश्वास आणि आमच्या सोल्यूशन्सची सुसंगतता दर्शवते. या वर्षात, आम्ही ई-ट्रान्समिशनच्या औद्योगिकीकरण आणि पुरवठ्यासाठी मोंट्रा इलेक्ट्रिकसोबत अंदाजे १७५ दशलक्ष रुपयांचा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस करार केला आहे. हा प्रकल्प चांगल्या प्रगतीपथावर असून, क्षेत्रीय प्रमाणीकरणासाठी आम्हाला ट्रान्समिशन पुरवण्याचा प्रोटोटाइप (प्रतिकृती) आदेश मिळाला आहे. इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी इतर एका ग्राहकासोबत सुरू असलेली चर्चा देखील सकारात्मक दिशेने पुढे जात असून, आगामी काळात हा व्यवसाय लक्षणीयरित्या विस्तारेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

गिअर्स व्यवसायामध्ये, आम्ही आर्थिक वर्ष २०२८ पासून लागू होणाऱ्या बुल गिअर्ससाठी एका मोठ्या ओईएमकडून अंदाजे १५० दशलक्ष रुपये प्रति वर्ष मूल्याचे बिझनेस नॉमिनेशन (व्यवसाय कंत्राट) मिळवले आहे. आर्थिक वर्ष २०२६ दरम्यान गिअर्स व्यवसाय संथ राहिला असला, तरी आम्ही दोन नवीन ग्राहक/प्रकल्पांवर काम करत आहोत. चालू असलेल्या या उपक्रमांमुळे आगामी तिमाहींमध्ये कामगिरीत टप्प्याटप्प्याने सुधारणा होण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.

उत्पादन आघाडीवर, आम्ही क्षमता, तंत्रज्ञान आणि प्रक्रियांमधील सुधारणांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहोत. आर्थिक वर्ष २०२६ दरम्यान, नवीन टेलिस्कोपिक हँडलर अॅक्सल उत्पादनाला, कृषी वापरासाठीच्या उच्च-कामगिरीच्या ट्रान्समिशन कार्यक्रमांना आणि वाढीव क्षमता विस्ताराला पाठबळ देण्यासाठी आम्ही ४१७ दशलक्ष रुपयांचा भांडवली खर्च (कॅपेक्स) केला आहे. अॅक्सल क्षमता १,५४,१६० युनिट्सपर्यंत वाढवण्यासाठी संचालक मंडळाने मंजूर केलेला कॅपेक्स आमच्या भक्कम मागणीच्या अंदाजाशी सुसंगत आहे आणि भविष्यातील वाढीला पाठबळ देईल. आम्ही अधिकृत सेवा केंद्रांचा विस्तार करून आमची आफ्टरमार्केट आणि ग्राहक साहाय्य परिसंस्था मजबूत करणे देखील सुरू ठेवले आहे.

एकंदरीत, कॅरारो इंडिया अधिक मजबूत व्यावसायिक पाया, दृढ

ग्राहक संबंध, प्रगत इंजिनिअरिंग क्षमता, वाढते स्थानिकीकरण आणि प्रमुख अंतिम बाजारपेठांमधील मागणीचा सकारात्मक अंदाज यांसह आपल्या विकासाच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments