Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedकमिन्स इंडिया लि.ची चांगली कामगिरी

कमिन्स इंडिया लि.ची चांगली कामगिरी

पुणे,28 मे 2026 : कमिन्स इंडिया लि.च्या संचालक मंडळाने 27 मे 2026 रोजी झालेल्या बैठकीत 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाचे आर्थिक निकालांना मंजूरी दिली. 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात गतवर्षीच्या तुलनेत एकूण विक्रीत 18 टक्के वाढ झाली असून 11,950 कोटी रूपयांवर पोहचली आहे.देशांतर्गत विक्रीत 19 टक्के वाढ झाली असून 9961 कोटी रूपये तर निर्यात विक्रीत 12 टक्के वाढ झाली असून 1989 कोटी रुपयांवर पोहचली आहे.करपूर्व नफा गतवर्षीपेक्षा 24 टक्क्यांनी वाढला असून 3104 कोटी रूपयांवर पोहचला आहे.करपश्चात नफा 22 टक्क्यांनी वाढला असून 2330 कोटी रूपयांवर पोहचला आहे.

 

31 मार्च 2026 रोजी संपलेल्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत एकूण विक्री 23 टक्क्यांनी वाढून 2963 कोटी रूपयांवर पोहचली आहे. देशांतर्गत विक्री 30 टक्क्यांनी वाढून 2513 कोटी रूपयांवर तर निर्यात विक्री 6 टक्क्यांनी कमी होऊन 450 कोटी रूपयांवर पोहचली आहे. करपूर्व नफा गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढून 820 कोटी रुपयांवर पोहचला आहे.तर करपश्चात नफा 650 कोटी रूपयांवर पोहचला आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments