Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा ऑटोकॉम्प आणि जाहवा इलेक्ट्रॉनिक्सची हातमिळवणी; भारताच्या इव्ही बाजारपेठेसाठी प्रगत थर्मल मॅनेजमेंट...

टाटा ऑटोकॉम्प आणि जाहवा इलेक्ट्रॉनिक्सची हातमिळवणी; भारताच्या इव्ही बाजारपेठेसाठी प्रगत थर्मल मॅनेजमेंट सोल्यूशन्स विकसित करणार

पुणे, भारत 28 मे २०२६: टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स लिमिटेडने प्रगत लो-व्होल्टेज आणि हाय-व्होल्टेज पीटीसी हीटर्सचे स्थानिक पातळीवर उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी कोरियाच्या जाहवा इलेक्ट्रॉनिक्ससोबत संयुक्त उपक्रम सुरू केला आहे. ही भागीदारी अभियांत्रिकी आणि चुंबकीय मटेरिअल क्षेत्रातील जाहवाच्या कौशल्याचा वापर करून भारतातील इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहन क्षेत्रातील कार्यक्षम थर्मल मॅनेजमेंट सोल्यूशन्सची वाढती मागणी पूर्ण करेल.

 

 

 

या भागीदारीमुळे जाहवा इलेक्ट्रॉनिक्सचे उच्च-कार्यक्षम थर्मल तंत्रज्ञान आणि टाटा ऑटोकॉम्पची स्थानिक पातळीवरील मजबूत उत्पादन इकोसिस्टिम, ग्राहक संबंध आणि बाजारपेठेतील आघाडीचे स्थान एकत्र येतील. दोन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन सुरु केलेला हा संयुक्त उपक्रम भारतात स्थानिक पातळीवर लो- आणि हाय-व्होल्टेज पीटीसी हीटर्सचे उत्पादन करेल, जागतिक आणि देशांतर्गत ओईएम्सकडून इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांमध्ये केल्या जाणाऱ्या मोठ्या गुंतवणुकीचा लाभ त्याला मिळेल. यामुळे जाहवासाठी भारत हे एक महत्त्वाचा धोरणात्मक केंद्र बनेल.

 

 

 

या भागीदारीबद्दल बोलताना जाहवा इलेक्ट्रॉनिक्सचे सीईओ श्री. चॅनयाँग किम म्हणाले: “टाटा ऑटोकॉम्पसोबत मिळून भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत आणि पायाभूत सुविधांच्या इकोसिस्टिममध्ये योगदान देण्याची संधी मिळणे जाहवा इलेक्ट्रॉनिक्ससाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जाहवाकडील अचूक कम्पोनंट तंत्रज्ञान आणि टाटा ऑटोकॉम्पचे मजबूत स्थानिक नेटवर्क व कौशल्य यांना एकत्र करून, भारतीय बाजारपेठेसाठी अनुकूल अशी उच्च-कार्यक्षम थर्मल मॅनेजमेंट सोल्यूशन्स प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे.

 

 

 

देशांतर्गत वाहन उत्पादक आणि जागतिक ओईएम्स इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील गुंतवणुकीचा वेगाने विस्तार करत असल्याने, भारतातील इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. हाय-व्होल्टेज आणि लो-व्होल्टेज दोन्ही पीटीसीचे प्रमुख पुरवठादार म्हणून बाजारपेठेत प्रवेशाचा भक्कम पाया रचण्यासाठी आमच्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. टाटा ऑटोकॉम्पसोबत ही भागीदारी करणे हा एक सखोल धोरणात्मक निर्णय आहे; टाटा समूहाचा बाजारपेठेतील प्रचंड प्रभाव, व्यवसायाची व्याप्ती आणि अपवादात्मक कॉर्पोरेट विश्वासार्हता आम्हाला या संपूर्ण क्षेत्रात एक स्थिर स्थान मिळवून देण्याची आणि शाश्वत वाढीला गती देण्याची खात्री देते.”

 

 

 

या संयुक्त उपक्रमाबद्दल बोलताना टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्सचे व्हाइस चेअरमन श्री. अरविंद गोयल म्हणाले: “जागतिक दर्जाचे ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान भारतात आणण्याच्या टाटा ऑटोकॉम्पच्या धोरणातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, विशेष इलेक्ट्रॉनिक कंम्पोनंट्सची जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असलेली, आघाडीची कंपनी असलेल्या जाहवा इलेक्ट्रॉनिक्ससोबतची आमची भागीदारी भारताच्या बदलत्या मोबिलिटी क्षेत्रासाठी नाविन्यपूर्ण व शाश्वत सोल्यूशन्स आणण्यास मदत करेल.”

 

 

 

टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्सचे एमडी आणि सीईओ श्री. मनोज कोल्हटकर म्हणाले: “जाहवा इलेक्ट्रॉनिक्सचे उत्तम तांत्रिक ज्ञान आणि आमची देशातील मजबूत उत्पादन क्षमता एकमेकांना पूरक आहेत. सातत्याने नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेऊन ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याचे आमचे ध्येय या उपक्रमातून दिसून येते.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments