Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रिएटिव्ह इंजिन एक्सपो’ २०२६ चे उद्या उद्घाटन* *जिओ+हॉटस्टारचे प्रेसिडेंट आलोक जैन...

क्रिएटिव्ह इंजिन एक्सपो’ २०२६ चे उद्या उद्घाटन* *जिओ+हॉटस्टारचे प्रेसिडेंट आलोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन; दोन दिवस प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले*

 

पुणे : पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘क्रिएटिव्ह इंजिन एक्सपो २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या , शनिवार दि. ३० मे रोजी सकाळी १० वाजता गणेश कला क्रीडा मंच येथील प्रदर्शन हॉलमध्ये होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिओ+हॉटस्टारचे प्रेसिडेंट आलोक जैन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, डॉ. होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनिश कामत, पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत, कंपनी 3 चे सीईओ प्रफुल गाडे, आयआयसीटीचे संचालक आशीष कुलकर्णी, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक बापू मानकर, नगरसेवक सुनील पांडे, नगरसेवक अपूर्व खाडे, नगरसेविका तेजश्री महेश पवळे, नगरसेविका वीणा गणेश घोष, श्रीनाथ सहकारी साखर कारखान्याचे कार्याध्यक्ष विकास रासकर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शनिवार ३० मे आणि रविवार ३१ मे २०२६ असे दोन दिवस सकाळी १० ते रात्री ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये क्रिएटिव्ह क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान, संकल्पना आणि रोजगाराच्या संधींबाबत प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कॉमिक्स, अॅनिमेशन, ग्राफिक्स, गेम्स, व्हिज्युअल इफेक्ट्स, डिजिटल शैक्षणिक साधने, वर्च्युअल प्रोडक्शन, 3D प्रिंटिंग, व्हर्च्युअल रिअॅलिटी आदी क्षेत्रांतील निर्मिती प्रक्रिया कशी घडते, त्यामागील कल्पकता आणि तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो याची माहिती तज्ज्ञांकडून मिळणार आहे.

तसेच या क्षेत्रामधून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या आणि उद्योगवाढीच्या संधींबाबत उपस्थित तज्ज्ञांशी संवाद साधता येणार असून, क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

प्रदर्शनाचे मुख्य संयोजक तसेच सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संस्थापक संतोष रासकर यांनी सांगितले की, “भारताला भविष्यात ‘ऑरेंज इकॉनॉमी’चे जागतिक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या नव्या आणि वेगाने वाढणाऱ्या आर्थिक व्यवस्थेबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.”

ते पुढे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या २०२६ च्या अर्थसंकल्पात पुणे-मुंबई एव्हीजीसी कॉरिडॉर उभारून या क्षेत्रात ५० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शहराला या उद्योगात देशाचे नेतृत्व करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच केंद्र सरकारने शिक्षण व्यवस्थेत क्रिएटिव्ह लॅब उभारण्याची घोषणा केल्याने भविष्यात शालेय शिक्षणात क्रिएटिव्ह शिक्षणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.”

बदलत्या काळात शिक्षण, उद्योग, रोजगार आणि जीवनशैली या सर्वच क्षेत्रांवर क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा प्रभाव वाढणार असल्याने हे प्रदर्शन विशेष महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत संतोष रासकर यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments