Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिवे येथे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विशेष सुविधा

दिवे येथे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विशेष सुविधा

 

 

पुणे, दि. २९ (जिमाका, वृत्तसेवा) : वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज वेळेत पूर्ण होण्यासाठी वाहन चालक व मालकांच्या सोयीसाठी मौजे दिवे येथील कार्यालयात रविवार, ३१ मे २०२६ या शासकीय सुट्टीच्या दिवशीही योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाची सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे.

 

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार २०० वाहनांसाठी कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. वाहन चालक व मालकांनी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी आपली वाहने दिवे कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच स्कूल बस चालक व मालकांनी आपल्या वाहनांची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करून घ्यावे. स्कूल बस वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments