Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorized*पुणे लोकसभा - महायुती समन्वय बैठक*

*पुणे लोकसभा – महायुती समन्वय बैठक*

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील सहयोगी पक्षांची विधानसभाश: बैठक होणार असून सोमवार 18 मार्च रोजी 3 विधानसभा मतदारसंघाच्या बैठका होणार असून पुणे, बारामती, शिरूर लोकसभा क्लस्टर चे प्रमुख *ना. चंद्रकांतदादा पाटील* महायुतीतील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांसह बैठक घेणार आहेत. त्यांच्या समवेत आजी माजी लोकप्रतिनिधी सह शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय माशिलकर,राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर, भाजपा चे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद (नाना) भानगिरे, आर पी आय चे शहर अध्यक्ष संजय सोनावणे, शैलेश चव्हाण,लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संजय आल्हाट, आरपीआय (खरात गटाचे) सचिन खरात,शिवसंग्राम चे अध्यक्ष भरत लगड,लहुजी शक्ती सेनेचे विष्णू कसबे,या सह रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना, स्वाभिमान संघटना,भीमसेना,राष्ट्रीय स्वराज्य सेना, लहुजी सेना,बहुजन रिपब्लिकन एकता मंच,पीपल्स रिपब्लिक पार्टी (जोगेंद्र कवाडे गट) यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सदर बैठकींचा तपशील खालीलप्रमाणे….. 👇
उद्या सोमवार *18 मार्च*
*सकाळी 10 ते दुपारी 12:30* *शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची बैठक*.
सावरकर स्मारक हॉल, विमलाबाई गरवारे शाळे समोर, कर्वे रस्ता, येथे संपन्न होईल.
तर दुपारी
*पर्वती विधानसभा मतदारसंघाची बैठक *2 ते 5 ह्या वेळेत *संगम सोसायटी, अण्णाभाऊ साठे नाट्यगृहा समोर, स्वामी विवेकानंद पुतळ्या च्या मागे.पुणे सातारा रस्ता* येथे संपन्न होईल.
18 तारखेलाच *कोथरूड विधानसभा मतदारसंघाची* बैठक
सायं 6 ते 8 या वेळेत अंबर हॉल, कर्वे रस्ता, कोथरूड येथे संपन्न होईल असे महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
तसेच मंगळवार 19 मार्च रोजी सकाळी 10 वाजता वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची बैठक मातोश्री अनुसया सांस्कृतिक भवन, साईबाबा मंदिरापुढे, चंदननगर येथे संपन्न होईल.त्यानंतर दुपारी 2 ते 5 ह्या वेळेत कसबा विधानसभा मतदारसंघाची बैठक वरदश्री सभागृह, राजा दिनकर केळकर संग्रहालय च्या कोपऱ्यावर.
नातुबाग, बाजीराव रस्ता येथे संपन्न होईल.
पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाची बैठक सायं 6 ते 8 वाजता ह्या वेळेत आईमाता मंदिरामागे,यशराज गार्डन समोर.
गंगाधाम चौक येथे संपन्न होईल.
ह्या बैठकीत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचे नियोजन करण्यात येईल असे महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments