Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedकचरा वेचकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू ...

कचरा वेचकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू ५०० हून अधिक कचरा वेचकांनी घेतला सहभाग

पिंपरी, दि. ८ जून २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ (एनएसकेएफडीसी) अंतर्गत शहरातील कचरा वेचकांसाठी कौशल्य विकास व सुरक्षा प्रशिक्षण सुरू असून आतापर्यंत ५०० हून अधिक कचरा वेचकांनी त्यामध्ये सहभाग नोंदविला आहे.

 

 

 

एनएसकेएफडीसी यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या प्रशिक्षणामध्ये व्यावसायिक आरोग्य व सुरक्षा, वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (पीपीई) वापर, प्रथमोपचार, आर्थिक साक्षरता, महिला सुरक्षा, व्यसनमुक्ती तसेच विविध शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे. लाभार्थ्यांना ई-श्रम कार्ड, आयुष्मान भारत योजना, स्वयंसहाय्यता गटांची स्थापना आणि आधुनिक कचरा संकलन वाहनांसाठी उपलब्ध अनुदान योजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे.

 

 

 

केंद्र शासनाच्या ‘नमस्ते’ योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात उर्वरित कचरा वेचकांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिकाधिक लाभार्थ्यांना प्रशिक्षणाच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) आणि ‘स्किल इंडिया’चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

 

 

 

शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत कचरा वेचकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या आरोग्याचे संरक्षण, सुरक्षितता आणि आर्थिक सक्षमीकरण यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण उपयुक्त ठरत आहे. या माध्यमातून त्यांना सामाजिक सुरक्षेच्या विविध योजनांशी जोडण्याचे कामही केले जात आहे, असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments