Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री महालक्ष्मी मंदिरात अधिक मासानिमित्त पुस्तक तुला  सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात...

श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक मासानिमित्त पुस्तक तुला  सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक मासानिमित्त महिनाभर कार्यक्रम 

 

 

पुणे : दानाचे महत्व भारतीय संस्कृतीमध्ये आणि अधिक मासात सर्वाधिक आहे. हा मास सर्वत्र आनंदाने आणि हर्षाने साजरा केला जातो. दानाचे महत्व या महिन्यात अधिक असल्याने सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पुस्तक तुला करण्यात आली. ही पुस्तके व वह्या पुण्यातील विविध शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येणार आहे.

 

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे अधिक मास निमित्त मंदिरात महिनाभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ही पुस्तक तुला करण्यात आली. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांसह विश्वस्त मंडळाने उपक्रमांचे संयोजन केले आहे. यावेळी विश्वस्त प्रवीण चोरबेले, नारायण काबरा, हेमंत अर्नाळकर हे उपस्थित होते.

 

श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री विष्णू भगवान यांच्या उत्सवमूर्तीची तुला करण्यात आली. श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे गरजू विद्यार्थ्यांना सुमारे १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. पुण्यातील मराठी शाळांतील विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या आणि शालेय साहित्य देण्यात येणार आहेत. सोमवार, दि. १५ जून पर्यंत दररोज सायंकाळी ५ नंतर मंदिरामध्ये उपक्रम होणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.डॉ.चारुदत्त आफळे यांचे कीर्तन यांसह श्री सूक्त हवन, सुवर्ण कमल रजत कमल अर्चना, सहस्त्र बेल पत्र अर्चना, तुळशी अर्चना, पुष्प अर्चना, दीप उत्सव असे धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. तरी देवी भक्तांनी मोठया संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले

आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments