पुणे, १८ मार्च २०२४ : द लीला पॅलेसेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स तर्फे इच्छुक महिला शेफसाठी कालिनरी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम म्हणून ‘शेफ्स ॲट द लीला’ कार्यक्रम सादर करण्यात आले आहे. हा कार्यक्रम हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये रोजगार प्राप्त करण्याची एक पाऊल असून द लीला पॅलेसेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्ससह पाककला क्षेत्रात करिअर करण्यासाठी एक मजबूत पाया आहे.आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी लीला पॅलेस जयपूर येथे 8 आणि 9 मार्च 2024 रोजी ‘शेफ्स ॲट द लीला’ कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले. या 2-दिवसीय कार्यक्रमात, मोहन महल येथे एक भव्य गाला डिनरचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेफ रसिका मिथिली वेंकटेसा, शेफ ताश्या मेहरोत्रा आणि शेफ तेजस्वी चंडेला या जागतिक स्तरावरील नामांकित महिला शेफ्सने सहा कोर्स मेनू तयार केला होता.
लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स तर्फे ‘शेफ्स ॲट द लीला’ उपक्रम
RELATED ARTICLES


