Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedसैनिकी मुलांचे व मुलींचे वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू*

सैनिकी मुलांचे व मुलींचे वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू*

 

पुणे, दि. 8 (जिमाका, वृत्तसेवा): शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पुणे येथील सैनिकी मुलांचे व मुलींचे वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज व माहितीपत्रक कार्यालयीन वेळेत सैनिकी मुलांचे वसतिगृह, पर्वती, पुणे तसेच सैनिकी मुलींचे वसतिगृह, नवी पेठ, पुणे येथे उपलब्ध आहेत.

युद्धविधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, माजी सैनिक तसेच सेवारत सैनिक यांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज संबंधित वसतिगृह अधीक्षक, अधीक्षिका यांच्याकडे २५ जून २०२६ पर्यंत सादर करावेत. विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया उशिरा झाल्यास अर्ज सादर करण्याची मुदत वाढविण्यात येणार असल्याची माहिती मेजर (डॉ.) शिल्पा मारोती खरपकर (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी दिली आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments