चेन्नई,११ जून 2026 : आघाडीच्या रेव्हेन्यू सायकल मॅनेजमेंट, रिस्क ॲडजस्टमेंट आणि हेल्थकेअर टेक्नोलॉजी कंपनी असलेल्या ईसीएलएटी हेल्थ सोल्युशन्स ने गल्फ कॅपिटल कडून मॅनेजमेंट बायआऊट (एमबीओ) ची प्रक्रिया पूर्ण केली.गल्फ कॅपिटल ही जीसीसी ते आशिया पर्यंत गुतंवणूक करणाऱ्या सर्वांत मोठ्या व सक्रीय प्रा.इक्विटी कंपन्यांपैकी एक आहे.या व्यवहारामुळे एका अत्यंत यशस्वी भागीदारीची सांगता होत असून ईसीएलएटीची पूर्ण मालकी पुन्हा तिच्या संस्थापक व व्यवस्थापन टीमकडे सोपवली जात आहे.


