Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedसर परशुरामभाऊ महाविद्यालयाचा ११० वा वर्धापन दिन रविवारी (दि.१४ जून)* ...

सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचा ११० वा वर्धापन दिन रविवारी (दि.१४ जून)* राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती 

 

 

पुणे : शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या ११० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि.१४ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भाऊसाहेब चितळे सभागृह, शिक्षण प्रसारक मंडळीची नवी इमारत, सहावा मजला, स. प. महाविद्यालय क्रीडांगणाशेजारी होणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील यांनी दिली.

 

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. तर, अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. सदानंद फडके असतील.

 

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष सुधीर काळकर, शिक्षण प्रसारक मंडळीचे उपाध्यक्ष गजेन्द्र पवार तसेच शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

 

महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी असलेल्या पुणे विभागीय आयुक्त शितल उगले आणि पुण्याचे मुख्य आयकर आयुक्त विवेक वाडेकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments