Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedनदीपात्रात विक्रेते, पार्किंग पाठोपाठ तबेले आणि घोडागाड्यांचे अतिक्रमण , आहे ते आहेच...

नदीपात्रात विक्रेते, पार्किंग पाठोपाठ तबेले आणि घोडागाड्यांचे अतिक्रमण , आहे ते आहेच -संदीप खर्डेकर

पुणे –

बाबा भिडे पुल ते राजपूत वीट भट्टी ह्या नदीपात्रातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत विक्रेत्यांनी दुकानं थाटली आहेत. अधूनमधून नागरिकांनी तक्रारी केल्या की कारवाई चा फार्स केला जातो आणि पुन्हा ” आहे ते आहेच ” !! ही बाब भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.याविषयी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की

आता तर बाबा भिडे पुलाजवळ जेथे खाद्य पदार्थांची चौपाटी आहे तेथे किमान 20 घोडागाड्या उभ्या असतात आणि पुलाखाली तर तबेलाच झाला आहे. येथे घोडे बांधलेले असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. अर्थातच यांस मनपा प्रशासनाने कोणतीही परवानगी दिलेली नसावी असा आमचा समज आहे.

पुणेकरांना आता याची सवय झाली असून ” हे असेच चालायचे ” असं म्हणून नागरिक निमूटपणे सहन करतात. या उद्योगामागील अर्थपूर्ण संबंधाची माहिती सर्वांनाच आहे,मात्र ” अतिक्रमण ” या विषयावरील पुणेकरांच्या भावना तीव्र असून नागरिकांचे मौन ही वादळापूर्वीची शांतता आहे याची नोंद घ्यावी.

तोंडदेखली कारवाई होईल याची खात्री आहे पण कारवाई व्हावी यासाठी पत्र देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments