एरंडवणे पुणे येथील एस हॉस्पिटल मधील एस डेंटल क्लिनिक येथे गुरुवार, शुक्रवार, शनिवार दि. २१, २२ व २३ मार्च २०२४ रोजी स. ११ ते दु.२ या वेळेत “मोफत दंत तपासणी व उपचार शिबीर” आयोजित करण्यात आले आहे. सर्व वयोगटातील नागरिकांसाठी हे शिबीर उपयुक्त असणार आहे. शिबिरामध्ये अनुभवी दंतोपचार तज्ञांकडून दंत तपासणी व सल्ला मोफत असणार आहे.याबरोबरच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दात साफ करणे,रूट कॅनल, कृत्रिम दात बसविणे, दातातील कॅव्हिटी वरील उपचार, कवळी बसविणे, वेडीवाकडी दात सरळ करणे या सेवा दिल्या जाणार आहेत तसेच शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांना पुढील उपचारांवर ३०% सवलत दिली जाणार आहे.शिबिरासाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. शिबीर स्थळ – एस डेंटल क्लिनिक, एस हॉस्पिटल, गुळवणी महाराज रोड, एरंडवणे पुणे. संपर्क – 020-67029100.
एस हॉस्पिटल तर्फे मोफत दंत तपासणी व उपचार शिबीर
RELATED ARTICLES


