Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorized*श्री महालक्ष्मी मंदिरात उत्सव मूर्तींची धान्य तुला*   सारसबागेसमोरील श्री...

*श्री महालक्ष्मी मंदिरात उत्सव मूर्तींची धान्य तुला*   सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिर ; धान्याचे अनाथाश्रमांना होणार वाटप

 

पुणे : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पुरुषोत्तम मासानिमित्त श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली आणि श्रीविष्णू यांच्या उत्सव मूर्तींची धान्य तुला करण्यात आली. या उपक्रमातून जमा झालेले सर्व धान्य विविध अनाथाश्रमांना वाटप करण्यात येणार आहे.

 

ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल तसेच प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली धान्य तुला कार्यक्रम संपन्न झाला.या प्रसंगी मंदिराचे विश्वस्त प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.

 

अधिक मासानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिरात महिनाभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. धान्य तुलेच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्याची जोड देत मंदिराच्या वतीने जमा झालेले धान्य गरजू आणि अनाथाश्रमांमधील गरजूंना देण्यात येणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments