पुणे, दि. 21 : विश्रांतवाडी कॅम्पस, पुणे येथील शासकीय वसतिगृहात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गृहप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय योगतज्ज्ञ डॉ. मंजू कदम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. कदम यांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम व ध्यान यांची प्रात्यक्षिके करून घेतली. तसेच विद्यार्थी जीवनात योगाचे महत्त्व विशद करून नियमित योगाभ्यासाचे फायदे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व संकल्पाने झाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योग दिन साजरा केला.
0000


