Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedरोटरी क्लब ऑफ पुणे पाषाणकडून पुण्यातील केईएम हॉस्पिटलला कार्डियाक ॲम्ब्युलन्स

रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाणकडून पुण्यातील केईएम हॉस्पिटलला कार्डियाक ॲम्ब्युलन्स

पुणे,२४ जून २०२६ : रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाणच्या पुढाकारातून आणि रोटरी फाउंडेशनच्या ग्लोबल ग्रँट प्रकल्पांतर्गत केईएम हॉस्पिटल पुणे ला अत्याधुनिक ॲडव्हान्स्ड लाईफ सपोर्ट (एएलएस) कार्डियाक ॲम्ब्युलन्स देण्यात आली. या प्रकल्पासाठी फिनलंडमधील रोटरी क्लब ऑफ राआहे यांनी ग्लोबल पार्टनर म्हणून सहकार्य केले.

या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टसाईड, पुणे कर्वेनगर, पुणे हडपसर, पनवेल इंडस्ट्रियल टाऊन, पुणे मगरपट्टा सिटी, पुणे अमनोरा, पुरंदर आणि पुणे मगरपट्टा एलिट या क्लब्सनी सहभाग नोंदविला. तसेच अंजली आणि प्रदीप मुळे यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
ॲम्ब्युलन्सच्या लोकार्पण समारंभाचे उद्घाटन जिल्हा रोटरी फाउंडेशन चेअरमन (डीआरएफसी) रोटेरियन पंकज शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

समारंभास केईएम हॉस्पिटल पुणे चे वैद्यकीय संचालक डॉ.झक्सेस कोयाजी, मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीन वाडिया, रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाणच्या अध्यक्षा रोटेरियन प्राजक्ता जेरे, मानद सचिव रोटेरियन दीपा पानसे, ग्लोबल ग्रँट संचालक रोटेरियन हेमंत जेरे तसेच विविध रोटरी क्लब्सचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

ही अत्याधुनिक कार्डियाक ॲम्ब्युलन्स हृदयविकार व इतर गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच जीवनरक्षक उपचार उपलब्ध करून देणार असून, आपत्कालीन आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यास मदत करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments