पुणे,21 मार्च 2024 : जल व्यवस्थापनाबाबत आपले व्यापक प्रयत्न अधिक बळकट करत आयटीसी लि.ने रांजणगाव येथील आपल्या दोन अद्ययावत युनिटसाठी प्रतिष्ठेचे प्लॅटिनम लेव्हल एडब्ल्यूएस (अलायन्स फॉर वॉटर स्ट्युवर्डशिप) प्रमाणपत्र प्राप्त केले असून जल व्यवस्थापनामध्ये सर्वोच्च जागतिक मापदंड प्रस्थापित केला आहे.आणखी एक लक्षणीय टप्पा गाठत जागतिक पर्यावरण समस्यावर काम करणार्या व ना नफा संस्था असलेल्या सीडीनी कडून जल सुरक्षिततेसाठी लीडरशिप लेव्हल ए स्कोअर प्राप्त केला आहे.याआधी 2022 मध्ये कंपनीच्या मालूर येथील फूड युनिटसना एडब्ल्यूएस प्रमाणपत्र प्राप्त झाले होते व अशा प्रकारचे प्रमाणपत्र प्राप्त करणारी आशियातील पहिली खाद्य प्रक्रिया सुविधा ठरली होती. त्याचबरोबर कोवाई येथील आयटीसीच्या पेपर बोर्ड युनिटला एडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळाले होते.
आयटीसीच्या रांजणगाव येथील दोन युनिटसना प्रतिष्ठेचे प्लॅटिनम लेव्हल एडब्ल्यूएस प्रमाणपत्र
RELATED ARTICLES


