Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १ जुलै रोजी*

 

 

पुणे दि. २५ (जिमाका, वृत्त सेवा) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), जिल्हा कार्यालय पुणे अंतर्गत थेटकर्ज योजनेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून लाभार्थ्यांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दि. १ जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक सभागृह, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडणार असून संबंधित अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक संध्या जाधव यांनी केले आहे.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments