Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorized*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते* *सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा*

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते* *सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा*

 

 

पुणे दि. २५ (जिमाका, वृत्त सेवा) : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या वतीने संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा शुक्रवार २६जून २०२६रोजी सकाळी ११.३० वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार होणार असून, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

कार्यक्रमाला राज्यातील विविध मंत्री, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचा गौरव करण्याबरोबरच भावी स्पर्धा परीक्षा उमेदवारांना प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

 

सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर, व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील तसेच संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.

 

राज्यातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास नागरिक, विद्यार्थी, पालक व स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सारथी संस्थेच्या निबंधक समीक्षा चंद्राकर यांनी केले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments