Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedहुतात्मा जवान केशव गोसावी, तृतीयपंथी समाजसेविका आम्रपाली मोहिते यांना नरवीर सुभेदार तानाजी...

हुतात्मा जवान केशव गोसावी, तृतीयपंथी समाजसेविका आम्रपाली मोहिते यांना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे व ज्ञानेश सेवा समर्पण पुरस्कार जाहीर

*राजे शिवराय प्रतिष्ठान, कर्वेनगर तर्फे आयोजन; प्रमोद मुतालिक, विक्रमसिंह मोहिते, सचिन भोसले, शिरीष देशपांडे, मकरंद केळकर यांची उपस्थिती*

पुणे : देशाच्या रक्षणार्थ वीरमरण पत्करलेले हुतात्मा जवान केशव गोसावी यांना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे पुरस्कार आणि सावली सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा करणा-या आम्रपाली मोहिते यांना स्व. ज्ञानेश पुरंदरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ज्ञानेश सेवा समर्पण पुरस्कार कर्वेनगरमधील राजे शिवराय प्रतिष्ठानतर्फे जाहीर करण्यात आला. शनिवार, दिनांक २३ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता जय शिवराय चौक, कर्वेनगर येथे पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी खरात, उत्सव प्रमुख विशाल लोयरे, सजावट प्रमुख महेश रांजणे आदी उपस्थित होते.

शिवजयंती महोत्सवानिमित्त राजसदरेची कलाकृती प्रसिध्द कलाकार महेश रांजणे यांनी साकारली आहे तर श्री शिवराज्याभिषेक ३५० वर्षपूर्ती प्रेरणा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. कर्नाटकमधील श्रीराम सेनेचे अध्यक्ष अध्यक्ष प्रमोद मुतालिक हे प्रमुख वक्ते असून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी वीरपत्नी यशोदा गोसावी या पुरस्कार स्वीकारणार आहेत.

कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, बुलढाणा अर्बन को ऑप क्रे. सोसायटी लि. चे विशेष कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, गंगोत्री डेव्हलपर्सचे संचालक मकरंद केळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक महेश पवळे, अध्यक्ष शिवाजी खरात, उत्सवप्रमुख विशाल लोयरे, सजावट प्रमुख महेश रांजणे, अमित जाधव व अमित कदम यांसह कार्यकर्त्यांनी केले आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments