Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorized*'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'*

*’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’*

 

 

*पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून एक लाखाहून अधिक कर्जदारांचा तपशील अपलोड-जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप*

 

पुणे, दि.२९: राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्यादृष्टीने त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा उद्देशाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे, याअनुषंगाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ४१ थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्यात आहे, अशी माहिती सहकारी संस्था पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी दिली आहे.

 

सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण कार्यालयाच्यावतीने या योजनेची प्रभावी, पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला कर्जदारांचा तपशील पोटर्लवर माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले असता बॅकेच्यावतीने संपूर्ण कर्जदार खातेदाराची माहिती पोटर्लवर अपलोड केली आहे. त्याचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे: सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण कार्यालयाच्यावतीने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला शेतकऱ्यांच्या तपशील पोटर्लवर माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले असता बॅकेच्यावतीने संपूर्ण कर्जदार खातेदाराची माहिती पोटर्लवर अपलोड केली आहे. त्याचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे: आंबेगाव तालुक्यातील ३ हजार ३९०, बारामती १३ हजार ७२८, भोर ७ हजार २४२, दौंड १९ हजार ५६२, हवेली ४ हजार १६८, इंदापूर १८ हजार ८१८, जून्नर ७ हजार ७७८, खेड ७ हजार ८५३, मावळ ५ हजार १७२, मुळशी २ हजार ३८७, पुरंदर ७ हजार ९०३, शिरुर ८ हजार ४५२ आणि वेल्हा १ हजार ८८८ याप्रमाणे माहिती अपलोड केली आहे, अशी माहिती श्री. जगताप यांनी दिली आहे.

 

योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ११३ शेतकरी पात्र असूनही मयत असल्याने व अशा शेतकऱ्यांची वारस नोंद न झाल्याने अशा खात्याची माहिती अपलोड करता आलेली नाही.तसेच २९ सभासद लाभ घेण्यास पात्र असूनही त्यांचे आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने यांची माहिती पोर्टलवर अपलोड करता आलेली नाही. त्यामुळे मयत सभासदांच्या वारसांनी वारस नोंद तात्काळ करुन घ्यावी व आधार क्रमांक नसलेल्या सभासदांनी आधार क्रमांक उपलब्ध करून घ्यावा, जेणे करून त्यांची महिती पोर्टलवर अपलोड करता येईल, असे आवाहन श्री जगताप यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments