Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorized*पिंपरी-चिंचवड येथे स्वयंचलित वाहन योग्यता चाचणी केंद्र कार्यान्वित*

*पिंपरी-चिंचवड येथे स्वयंचलित वाहन योग्यता चाचणी केंद्र कार्यान्वित*

 

 

पुणे, दि. ३० : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवडच्या अधिकार क्षेत्रात १ जुलै २०२६ पासून स्वयंचलित वाहन योग्यता चाचणी केंद्र (ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन) कार्यान्वित करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार व्यावसायिक वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे (फिटनेस) नूतनीकरण स्वयंचलित चाचणी केंद्रावरून करणे बंधनकारक आहे.

 

वाहनधारकांनी https://vahan.parivahan.gov.in/AFMS या संकेतस्थळावर ऑनलाईन पूर्वनियोजित वेळ (अपॉइंटमेंट) आरक्षित करून विहित शुल्क भरावे. नेमून दिलेल्या दिवशी वाहन तपासणीसाठी सादर करताना वाहन सुस्थितीत असावे तसेच सर्व वैध कागदपत्रे, तसेच लागू असल्यास VLTD, SLD व रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप संदर्भातील आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

 

सध्या केंद्राचे कामकाज टप्प्याटप्प्याने सुरू असून, लवकरच पूर्ण क्षमतेने वाहन तपासणीची सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments