Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्व २०२६ निमित्त -...

महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्व २०२६ निमित्त – आढावा बैठकीचे आयोजन…   

 

 

 

 

पिंपरी, दि. १ जुलै २०२६ :- पिंपरी चिंचवड शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन दरवर्षी १ ते ५ ऑगस्ट या कालावधीत भक्ती शक्ती चौक,निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक परिसरात आयोजीत करण्यात येते.यामध्ये शहरातील सामाजिक संस्था, विविध शैक्षणिक व इतर संस्था, ट्रस्ट, कामगार संघटना, व्यक्ती कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात.

 

 

 

त्या अनुषंगाने यावर्षीही पिंपरी चिंचवड शहरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येणार आहे.यासाठी विचार विनिमय करण्यासाठी महापालिका पदाधिकारी तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व पोलिस प्रशासन, महापालिका अधिकारी आदी सर्वांची समन्वय बैठक महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार, दि.२ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता महानगरपालिकेमधील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

 

 

 

सदर बैठकीस संबंधित मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात

आले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments