Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न*

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न*

 

 

*एसआयआर गणना अर्ज वितरणास सहकार्य करण्याचे राजकीय पक्षांना आवाहन*

 

पुणे, दि. १ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाकरिता गणना अर्ज छपाई त्याचे जिल्ह्यात वितरण करण्यात येत आहे, याबाबत राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना सूचना देण्यात याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

 

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित राजकीय पक्षांसोबतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार शीतल मुळे-भामरे, यांच्यासह राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी, बहूजन समाज पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नॅशनल पिपल्स पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, एसआयआर कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे. याकरिता सुमारे ८ हजार ४१७ बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत जिल्ह्यात गणना अर्जाचे वितरण सुरु करण्यात आले आहे. याकामी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना (बीएलए) या प्रक्रियेत सहभागी होवून सहकार्य करावे, अशा सूचना बीएलएंना देण्यात याव्यात. तथापि अद्यापही विधानसभा मतदारसंघामध्ये काही राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक केलेली नाही, अशा राजकीय पक्षांनी बीएलएंची नियुक्ती करावी, राजकीय पक्षांनी ‘ईसीआय नेट’(ECINET) ॲप्लिकेशन डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.

 

 

निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल तसेच कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही, अशी ग्वाही श्री. डुडी यांनी यावेळी दिली.

 

यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी सूचना केल्या, याबाबत सकारात्मक कारवाई करण्यात येईल, असे श्री. डुडी यांनी सांगितले.

 

आतापर्यत राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष २२५, भारतीय जनता पार्टी ६ हजार २०१, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी ३ हजार २७०, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ९९०, शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २ हजार १६८, शिवेसना २ हजार ९७१, बहूजन समाज पार्टी ५ याप्रमाणे एकूण १५ हजार २३० बीएलए नियुक्त करण्यात आले आहेत.

 

श्री. डुडी म्हणाले, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार समान छायाचित्रे असणाऱ्या मतदारांची (वेगवेगळे मतदार पंरतू एकसारखी छायाचित्रे) यादी देखील बीएलओंना देण्यात आली आहे. अशा मतदारांची छायाचित्रे व फार्म क्रमांक ८ भरुन मतदारयादी दुरुस्तीचे कामकाज करण्याचे काम सुरु करण्यात येणार असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी बीएलओंना दिल्या आहेत.

 

 

घरभेट देऊन प्रत्यक्ष पडताळणी करावी. दोन्ही नोंदीतील व्यक्तींची स्वतंत्र ओळख (नाव, वय, नाते, पत्ता, फोटो इ.) तपासावी. जर फोटो चुकीचा मॅप झाला असेल, तर त्याची स्पष्ट नोंद करून बीएलओ चेकलिस्टमध्ये नमूद करावी. जर एकाच व्यक्तीची दुहेरी नोंद असल्याचे आढळले, तर त्याचा अहवाल मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना सादर करावा. अंतिम निर्णय (दुरुस्ती, वगळणे किंवा सुधारणा) फक्त मतदार नोंदणी अधिकारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतो. संबंधित मतदाराला आवश्यकतेनुसार नोटीस व सुनावणीची संधी दिली जाते. अधिकारी ची भूमिका पडताळणी व अहवाल देण्यापुरती असते, अशी माहिती श्री. डुडी यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments