राष्ट्रीय, जुलै १, २०२६: समकालीन संगीताच्या सोबतीने भारताच्या समृद्ध लोकसंगीत आणि प्रादेशिक संगीत परंपरांना प्रकाशझोतात आणण्याचा आपला प्रवास सुरू ठेवत कोक स्टुडिओ भारत त्याच्या चौथ्या सीझनच्या चौथ्या गाण्यासह परत आला आहे. ‘हूर’ गाण्याच्या माध्यमातून हा प्रवास यंदा काश्मीरच्या खोऱ्यात पोहोचला आहे. ‘हूर’ ही काश्मीरच्या शतकानुशतके जुन्या मौखिक कथाकथन परंपरेने प्रेरित असलेली लोककथा आहे, जिथे गायक-संगीतकार वेगवेगळ्या मैफिलींमध्ये एकत्र जमून राजे, प्रेमीयुगुल, भटके आणि गूढ गोष्टींच्या कथा गाण्यातून सादर करायचे.
हे गाणे काश्मीरी कथाकथन परंपरा आणि ‘अफसाना गोरी’च्या आध्यात्मिक तत्वांवर आधारित आहे, ज्यामध्ये ‘शेख’ आणि ‘हूर’ या दोन पात्रांचा प्रवास संगीत आणि कथाकथनाच्या माध्यमातून उलगडतो. प्रेम, दुरावा आणि भक्ती या संकल्पनांच्या अवतीभोवती फिरणारी ही कथा काश्मीरी लोककथांमध्ये आढळणारे पौराणिक आणि काल्पनिक रंग घेऊन येते. हे सर्व प्रभाव या गाण्याच्या रचनेमध्ये विविध आवाजांचे स्तर, मनाला स्पर्श करणारी वाद्ये आणि रॉक म्युझिकच्या संगमाने गुंफले गेले आहेत, ज्यामुळे या परंपरेचा मूळ गाभा टिकून राहतो आणि नवीन पिढीच्या श्रोत्यांसमोर एका आधुनिक स्वरूपात सादर होतो.
ही कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम गायक-गीतकार फहीम अब्दुल्ला, संगीतकार व गायक अर्सलान निजामी आणि संगीतकार व गायक उस्ताद कैसर निजामी यांनी केले आहे. काश्मीरच्या संगीतबद्ध कथाकथन परंपरेने प्रेरित असलेले ‘हूर’ गाणे कथाकथन आणि सुरावलींच्या दरम्यान फिरत राहते, ज्यामुळे अगदी एखाद्या जिवंत मैफिलीसारखा अनुभव मिळतो. हे गाणे जुन्या काश्मीरी दंतकथेच्या रचनेवर आधारित असले, तरी त्याची निर्मिती आधुनिक संगीताच्या साथीने केली गेली आहे, ज्यामुळे काश्मीरी परंपरेचे वातावरण आणि भावना न गमावता हे गाणे आजच्या काळातील वाटते. या गाण्याचा शेवट एका काश्मीरी काव्यपंक्तीने होतो, ज्यामुळे ही कथा ज्या मातीतून जन्माला आली, तिथेच श्रोत्यांना परत घेऊन जाते.
प्रत्येक सीझनमध्ये कोक स्टुडिओ भारतने भारताच्या प्रादेशिक संगीत परंपरांमधील समृद्धता शोधण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी कलाकारांसोबत काम केले गेले आहे, जे सांस्कृतिक कथांचा मूळ गाभा टिकवून ठेवत आजच्या श्रोत्यांसाठी त्यांचा नवा अर्थ लावतात. ‘हूर’ गाणे याच प्रवासाचा पुढचा भाग आहे, जे काश्मीरची एक लोककथा विविध भौगोलिक सीमा आणि पिढ्यांमधील श्रोत्यांपर्यंत पोहोचवते.
कोका-कोला इंडिया आणि साऊथवेस्ट एशियाचे आयएमएक्स (इन्टीग्रेटेड मार्केटिंग एक्सपिरियन्स) लीड शंतनू गांगणे म्हणाले, “कोक स्टुडिओ भारतमध्ये आमचा विश्वास आहे की, भारताच्या सर्वात प्रभावी कथा विविध प्रांतांमधून, तिथल्या संस्कृती, आठवणी आणि जगलेल्या अनुभवांमधून जन्माला येतात. काश्मीरच्या कथाकथन परंपरेला स्वतःचा एक भावनिक आणि काव्यात्मक वारसा आहे. ‘हूर’च्या माध्यमातून आम्ही या अस्सलतेचा आदर करण्याचा आणि आजच्या श्रोत्यांसाठी आधुनिक स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. फहीम, अर्सलान आणि कैसर यांनी या कथेत एक वेगळाच सखोलपणा आणला आहे आणि या गाण्याचे संगीत कथेचा मूळ गाभा न गमावता या गाण्याला भौगोलिक सीमांच्या पलीकडे नेण्यास मदत करते. हे गाणे भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करण्याच्या आणि विविध पिढ्यांसाठी प्रस्तुत ठरवण्याच्या आमच्या विश्वासाला सादर करते.”
फहीम अब्दुल्ला म्हणाले, “‘हूर’मधील कथाकथनाने मला या गाण्याकडे आकर्षित केले. ही परंपरेतून आलेली कथा आहे, जी काश्मीरमध्ये पिढ्यानपिढ्या अस्तित्वात आहे, जिथे कथा संगीताच्या माध्यमातून पुढे नेल्या जातात आणि एका गायकाकडून दुसऱ्या गायकाकडे सोपवल्या जातात. कोक स्टुडिओ भारतमुळे आम्हाला या मूळ कथेची भावना अबाधित राखून अधिक मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली.”
अर्सलान निजामी म्हणाले, “काश्मीरी लोकसंगीत ज्या पद्धतीने कथाकथन आणि सुरावली यांच्यामध्ये फिरत राहते, त्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे, जे मला इतर कशातही आढळत नाही. कोक स्टुडिओ भारतमुळे आम्ही या संगीत परंपरेचे विविध स्तर अतिशय अस्सलतेने हाताळू शकलो. परंपरेचे वैशिष्ट्य टिकवून ठेवत आम्ही त्याला आमची स्वतःची सांगीतिक जोड दिली. इतक्या खोलवर रुजलेल्या संगीत प्रकारात काम करताना मिळालेले हे स्वातंत्र्य ‘हूर’ गाण्यावर काम करण्याचा अनुभव अत्यंत आनंददायी आणि सार्थकी लावणारा बनवते.”
उस्ताद कैसर निजामी म्हणाले, “‘हूर’ गाणे ऐकताना अगदी त्याच क्षणी आपल्याला कोणीतरी गोष्ट सांगत असल्याचा भास होतो. काश्मीरमध्ये मैफिलीतील संगीत नेहमी असे काम करत आले आहे, जिथे पुढील क्षणी काय घडणार या उत्सुकतेने जणू आपला श्वास रोखून धरला जातो. एखादे गाणे मोठ्या मंचावर जाते, तेव्हा हा जवळीकतेचा भाव गमावण्याची भीती असते. पण कोक स्टुडिओ भारतने ओळखले की, ही जवळीक आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर करून नष्ट न करता तशीच जपून ठेवली पाहिजे.”
‘हूर’ गाण्याच्या माध्यमातून कोक स्टुडिओ भारतच्या ४थ्या सीझनने भारताच्या लोकसंगीत आणि प्रादेशिक परंपरांचा आपला प्रवास पुढे सुरू ठेवला आहे, ज्यामध्ये प्रत्येक परंपरेत पुन्हा सांगावी अशी सुंदर कथा दडलेली आहे. ‘ऐ अजनबी’, ‘बुल्लेया वे’ आणि ‘कचौडी गली’ या गाण्यांनंतर या सीझनने आपल्या वाढत्या संग्रहात आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण आवाजाची भर घातली आहे, जो थेट काश्मीरच्या खोऱ्यातून आला आहे आणि ज्या भाषेत शतकानुशतकांचे संगीत सा
मावलेले आहे.


