८ जुलै २०२६ – सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी ए२७ ५जी स्मार्टफोनची विक्री सुरू झाल्याची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन आता सॅमसंग आऊटलेट्स, भागीदार स्टोअर्स, सॅमसंगच्या संकेतस्थळावर आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन लाइट ग्रीन, लाइट पिंक व ब्लॅक या तीन रंगांमध्ये आणि तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. ६ जीबी + १२८ जीबी, ८ जीबी + १२८ जीबी आणि ८ जीबी + २५६ जीबी. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत २८,९९९ रुपये आहे आणि या स्मार्टफोनवर ३,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि झिरो डाऊन-पेमेंट योजना उपलब्ध आहेत.
गॅलेक्सी ए२७ ५जी मध्ये ६.७ इंच, १२० हर्ट्झ सुपर एएमओएईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याला कॉर्निंग® गोरिला® ग्लास व्हिक्टस®+ चे संरक्षण आहे. सुरळीत मल्टिटास्किंग आणि गेमिंगसाठी हा स्मार्टफोन ४एनएम स्नॅपड्रॅगन® ६ जेन ३ मोबाईल प्लॅटफॉर्मसह यूएफएस ३.१ स्टोरेज आणि एलपीडीडीआर५एक्स रॅमने सुसज्ज आहे.
या स्मार्टफोनच्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये ४के रेकॉर्डिंग आणि ओआयएस सपोर्ट असलेला ५० मेगापिक्सल मेन कॅमेरा, ५ मेगापिक्सल अल्ट्रावाईड लेन्स आणि २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. या कॅमेऱ्याला ऑब्जेक्ट इरेझर, एडिट सजेशन्स आणि माय फिल्टर सारख्या एआय टूल्सचा सपोर्ट आहे. उच्च दर्जाचे व्हिडिओ कॉल्स आणि पोर्ट्रेट्ससाठी या स्मार्टफोनमध्ये १२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
गॅलेक्सी ए२७ ५जी मध्ये सर्कल टू सर्च विथ गुगल, २२ भाषांमध्ये रिअल-टाइम वॉइस ट्रान्सक्रिप्शन आणि गुगल जेमिनी व परप्लेक्सिटी देखील आहे. तसेच, बिक्स्बीमुळे वापरकर्ते नैसर्गिक भाषेत बोलून डिवाईस सेटिंग्स नियंत्रित करू शकतात, तर लाइव्ह ट्रान्सक्रिप्शन इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषांमधील कॉल्सना सपोर्ट करते.
गॅलेक्सी ए२७ ५जी मध्ये ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जेथे सहा वर्षांचे अँड्रॉइड ओएस आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळतील. तसेच सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग नॉक्स उपलब्ध आहे. सॅमसंग वॉलेटमुळे टॅप अँड पे, यूपीआय पेमेंट आणि डिजिटल आयडी सुरक्षितपणे स्टोअर करणे सोपे होते.
मॉडेल
व्हेरिएंट
मल्टी-बँक व यूपीआय कॅशबॅक
एनईपी
गॅलेक्सी ए२७ ५जी
६ + १२८ जीबी
३००० रूपये
२८,९९९ रूपये
८ + १२८ जीबी
३१,९९९ रूपये
८ + २५६ जीबी
३७,४९९ रूपये


