Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंपत्ती निर्मितीची पुनर्व्याख्या करण्यासाठी केफिनटेकच्या फिनेक्सतर्फे  त्याच दिवशी फिजिकल एसआयपी नोंदणीला...

संपत्ती निर्मितीची पुनर्व्याख्या करण्यासाठी केफिनटेकच्या फिनेक्सतर्फे  त्याच दिवशी फिजिकल एसआयपी नोंदणीला गती

  • धो

एआय आधारित प्रक्रिया परिवर्तनामुळे त्याच दिवशी एसआयपी नोंदणी प्रमाणात 15% वरून 90% पर्यंत वाढ; गुंतवणूकदार, वितरक आणि AMC साठी अत्याधुनिक पद्धतीने वेगवान ऑनबोर्डिंगची सुरुवात

 

मुंबई, 8 जुलै 2026: भारतातील म्युच्युअल फंड उद्योगक्षेत्र झपाट्याने विस्तारत असताना फिजिकल सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) आणि मँडेट नोंदणी प्रक्रियेला आधीच्या पारंपरिक पद्धतीत अचूक अनुपालन आणि डेटाची अखंडता सुनिश्चित करण्यासाठी अनेक टप्प्यांतील पडताळणी प्रक्रिया पार करण्याची गरज पडत असे. गेल्या काही वर्षांत डिजिटायझेशनमुळे या प्रक्रियेचा कालावधी कमी झाला असला, तरी संपूर्ण परिसंस्थेमधील फिजिकल प्रक्रिया पार पाडणाऱ्या कार्यशक्तीला अर्ज दाखल केल्यापासून पहिल्या सक्रिय व्यवहारापर्यंत सरासरी 21 ते 30 दिवस लागत असत.

 

जागतिक स्तरावरील गुंतवणूकदार आणि इश्यूअर सोल्यूशन्स पुरविणारी आघाडीची कंपनी केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (“केफिनटेक”) ने नुकत्याच सुरू केलेल्या फिनेक्स परिवर्तन कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रक्रियेला गती देत एक नवा मापदंड निर्माण केला आहे. संस्थात्मक कार्यप्रवाहांचे सखोल ज्ञान आणि आधुनिक ऑपरेशनल इंजिनिअरिंग यांची सांगड घालत, केफिनटेकच्या फिनेक्सने यशस्वीपणे फिजिकल एसआयपी नोंदणीला त्याच दिवशी पूर्ण होणारी वास्तव प्रक्रिया बनवले आहे.

 

पारंपरिक फिजिकल एसआयपी चौकटीची रचना काटेकोर, बहुस्तरीय अनुपालन मापदंड पूर्ण करण्यासाठी क्रमवार प्रक्रिया आणि समर्पित मॅन्युअल टप्प्यांवर आधारित होती. उद्योगाच्या पुढील वाढीच्या टप्प्याला पाठबळ देण्यासाठी, केफिनटेकच्या फिनेक्सने या संरचित चौकटीचे एकात्मिक डिजिटल परिसंस्थेत रूपांतर केले असून, क्रमवार प्रक्रियेच्या जागी कुशल समांतर प्रक्रिया प्रणाली लागू केली आहे:

एजेंटिक AI-आधारित अपवाद प्रक्रिया (Agentic AI-Driven Exception Processing): ही प्रणाली बहुतांश नियमित नोंदणी अर्जांचे गतिशील मूल्यमापन करून एका टप्प्यात मंजुरी देते. पेमेंट गेटवेतील फरकांचे रिअल-टाइम मूळ-कारण विश्लेषण करून प्लॅटफॉर्म नियमित अंमलबजावणीतील अपवाद आपोआप सोडवतो आणि केवळ प्रत्यक्ष विसंगती असलेली प्रकरणे तपासणीसाठी तज्ज्ञ विश्लेषकांकडे पाठवतो.

AI-आधारित ओळख प्रणाली (OCR/ICR): अर्ज सादर होताच फिजिकल ऑनबोर्डिंग कागदपत्रे त्वरित स्कॅन करून त्यांचे डिजिटायझेशन केले जाते. त्यामुळे सुसूत्र डेटा पाइपलाइन तत्काळ तयार होते आणि मॅन्युअल डेटा एंट्रीमुळे होणारा विलंब पूर्णपणे दूर होतो.

इंटेलीजंट म्हणजेच बुद्धिमान पडताळणी प्रणाली (Intelligent Validation Engines): गुंतवणूकदार आणि बँकिंग तपशीलांची स्रोत KYC आणि संस्थात्मक नोंदींशी रिअल-टाइममध्ये म्हणजेच प्रत्यक्ष त्या वेळी समकालीन पडताळणी केली जाते तसेच डेटा विसंगती प्रवेशाच्या प्रारंभिक टप्प्यावरच ओळखून त्यात सुधारणा केली जाते.

स्वयंचलित कार्यप्रवाह (Automated Workflows): पडताळणी पूर्ण झालेल्या अर्जांना नोंदणी प्रक्रियेतील प्रत्येक पुढील टप्प्यावर अखंडपणे पुढे नेले जाते. त्यायोगे विभागांमधील मॅन्युअल हस्तांतरणामुळे निर्माण होणारे कार्यात्मक अडथळे दूर होतात.

 

“गेल्या दशकात भारताने गुंतवणूक करणे अत्यंत सुलभ केले आहे आणि केफिनटेक गुंतवणूक प्रक्रियेला अधिक सक्षम आणि वेगवान बनविण्यात सक्रिय भूमिका बजावत आहे हे सुनिश्चित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे केफिनटेकच्या डोमेस्टिक फंड सर्व्हिसेसचे मुख्य कामकाज अधिकारी प्रवीण शंकरन यांनी सांगितले. “केफिनटेकच्या फिनेक्सच्या माध्यमातून आम्ही एसआयपी सक्रिय करण्याच्या प्रशासकीय प्रक्रियेला अधिक सुलभ करून गुंतवणूकदारांसाठी प्रक्रिया कालावधी अनुकूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले. AI, ऑटोमेशन आणि बुद्धिमान कार्यप्रवाह रचनेच्या साहाय्याने आम्ही अनेक आठवडे लागणाऱ्या प्रक्रियेचे रूपांतर एका दिवसात पूर्ण होण्याच्या कामात केले आहे. अधिक प्रतिसादक्षम आणि गुंतवणूकदार-केंद्रित म्युच्युअल फंड परिसंस्था उभारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

 

250 हून अधिक अभियंते आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या समर्पित टीमने संपूर्णपणे इन-हाऊस संकल्पना उभारणी, विकास आणि अंमलबजावणी केलेल्या केफिनटेकच्या फिनेक्समागील अभियांत्रिकी फ्रेमवर्कमुळे कार्यरत अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांमध्ये (AMCs) लक्षणीय वेग प्राप्त झाला आहे:

त्याच दिवशी एसआयपी सक्रिय: केफिनटेकद्वारे नोंदणी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी त्याच दिवशी एसआयपी सक्रिय होण्याचे प्रमाण 15% वरून 90% पर्यंत वाढले असून त्यामुळे गुंतवणूक त्वरित कार्यान्वित होते.

नवीन मँडेट सेटअप: 7 दिवसांच्या आत नवीन मँडेट यशस्वीरित्या स्थापन होण्याचे प्रमाण 65% वरून 90% पर्यंत वाढले असून, पूर्णपणे अनुकूलित प्रक्रियांमध्ये हे प्रमाण 99% पर्यंत पोहोचले आहे.

एक्सेप्शन ट्रॅकिंग आणि निराकरण: 100% निराकरण ट्रॅकिंग साध्य करण्यात आले असून, नेटवर्कमधील अपवादांमुळे अडथळा आलेल्या नोंदणी प्रक्रियेचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत निरीक्षण आणि दुरुस्ती शक्य झाली आहे.

एआय आधारित नकार विश्लेषण: नकाराच्या पद्धतींचे कुशल विश्लेषण लागू करण्यात आले असून त्यामुळे AMC ना होऊ न शकलेली एसआयपी नोंदणी पुन्हा यशस्वीपणे करण्यासाठी, पुनर्प्राप्ती दर सुधारण्यासाठी आणि व्यवसाय रूपांतरण वाढविण्यासाठी सक्रिय पावले उचलणे शक्य झाले आहे.

 

गुंतवणूकदारांसाठी याचा अर्थ असा की त्यांच्या भांडवलाची वाढ पहिल्याच दिवसापासून सुरू होते. त्यामुळे कार्यात्मक विलंब दूर होऊन घरगुती बचतीच्या दीर्घकालीन संपत्ती निर्मितीची क्षमता अधिकाधिक वाढते. वितरकांसाठी, वेगवान प्रक्रिया गुंतवणूकदारांच्या निर्णयापासून गुंतवणूक सक्रिय होईपर्यंतचा कालावधी कमी करून त्यांच्याशी असलेले संबंध अधिक मजबूत करते. प्रत्यक्षात ग्राहक संख्येत प्रभावीपणे सुधारणा करते. दुसरीकडे, अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांसाठी (AMCs) समर्पित अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट (AUM) अधिक जलद कार्यान्वित होतात. त्यामुळे फंड व्यवस्थापकांना भांडवलाच्या उपयोजनाचे वेळापत्रक तात्काळ दिसून येते, तसेच AI-आधारित विश्लेषणामुळे अयशस्वी नोंदणी प्रभावीपणे पुन्हा करून घेण्यास मदत होते.

 

महत्त्वाचे म्हणजे केफिनटेकचे फिनेक्स पेमेंट नेटवर्कमधील “डेटा डार्क स्पॉट्स” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांतील ब्लाईड स्पॉट्सवर मात करत संपूर्ण प्रक्रियेवर 100% एंड-टू-एंड दृश्यमानता उपलब्ध करून देते. त्यामुळे व्यवसायिक टीमना वितरक आणि गुंतवणूकदारांना अखंडपणे सहाय्य करण्यासाठी त्वरित आणि उपयुक्त

माहिती उपलब्ध होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments