Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedकृषी सुविधा निधी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

कृषी सुविधा निधी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. ९ (जिमाका, वृत्तसेवा): भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजनेअंतर्गत १९ जून ते २० जुलै २०२६ या कालावधीत विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे.

 

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रु. २ कोटींपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत तसेच क्रेडिट गॅरंटीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. गोदामे, शीतगृहे, पॅक हाऊस, प्रक्रिया केंद्रे, कस्टम हायरिंग सेंटर आदी कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येतो.

 

वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, प्राथमिक कृषी पत संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयं सहायता गट तसेच इतर पात्र संस्थांनी तालुका कृषी अधिकारी, आत्मा (ATMA), कृषी विभाग किंवा जवळच्या राष्ट्रीयीकृत, अनुसूचित बँकेशी संपर्क साधावा. तसेच https://agriinfra.dac.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक सुरज मडके यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments