Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंग गॅलेक्सी फोल्डेबल डिवाईसेससाठी प्री-रिझर्व्हची सुरूवात

सॅमसंग गॅलेक्सी फोल्डेबल डिवाईसेससाठी प्री-रिझर्व्हची सुरूवात

 

पुणे, ९ जुलै – सँमसंगच्या आगामी गॅलेक्सी फोल्डेबल डिव्हाईसेसचे ग्राहक प्री बुकिंग आत्ताच करू शकतात, असे कंपनीने जाहीर केले आहे. त्यासाठी ग्राहकांना ९९९ रुपये इतकी रिफंडेबल टोकन रक्कम भरावी लागेल. हे बुकिंग ग्राहक कंपनीच्या संकेतस्थळावर, सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्स,अँमेझाँन डाँट इन, फ्लिपकार्टसह भारतातील प्रमुख रिटेल आऊटलेट्समध्‍ये केले जाऊ शकते. नवीन फोल्डेबल डिवाईसेस प्री-रिझर्व्ह करणाऱ्या ग्राहकांना ही डिवाईसेस खरेदी केल्यावर २७९९ रुपयांचे फायदे मिळतील.

 

सॅमसंगने आपले फोल्डेबल डिवाईसेस अधिक पातळ, हलकी, शक्तिशाली आणि अधिक सुलभ बनवणे सुरू ठेवले आहे. यामध्ये सर्वोत्तम एआय क्षमतांचा नाविन्यपूर्ण रचनेशी मेळ घालण्यात आला आहे.

 

सर्वोत्तम एआय क्षमतांचा नाविन्यपूर्ण रचनेशी मेळ घालून सॅमसंगची नेक्‍स्‍ट-जनेरशन फोल्डेबल डिवाईसेस अधिक वैयक्तिकृत आणि अनुकूल अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत, जी एआय युगासाठी नवीन मानक स्थापित करतात.

 

गॅलेक्सी अनपॅक्ड इव्‍हेण्‍ट २२ जुलै रोजी लंडन, युके येथे आयोजित करण्यात आला आहे. हा इव्‍हेण्‍ट Samsung.com, सॅमसंग न्यूजरूम आणि सॅमसंगच्या युट्युब चॅनेलवर भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ६:३० वाजता लाइव्‍ह प्रसारित केला जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments