रक्तांचल सीझन 3 चे प्रसारण 16 जुलैपासून मोफत खास अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर ~
मुंबई, भारत – 10 जुलै, 2026: अॅमेझॉन एमएक्स प्लेयर, भारतातील आघाडीची विनामूल्य, प्रीमियम, जाहिरात-समर्थित व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेने आज रक्तांचल सीझन 3 च्या लक्षवेधी ट्रेलरचे अनावरण केले. या ट्रेलरने आतापर्यंतच्या प्रेक्षक-पसंतीच्या गुन्हेगारी फ्रँचायझीच्या सर्वात गुंतवणून ठेवणाऱ्या सीझनची निर्मिती केली आहे. रितम श्रीवास्तव दिग्दर्शित, सिद्धार्थ मिश्रा लिखित आणि जार मोशन पिक्चर्स निर्मित, आगामी सीझनमध्ये क्रांती प्रकाश झा, निकितिन धीर, करण पटेल, माही गिल, राजेश कुमार आणि विक्रम कोचर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पूर्वांचलच्या खडतर पार्श्वभूमीवर घडणाऱ्या नवीन सीझनमध्ये सूड, महत्त्वाकांक्षा, नाजूक युती आणि कट्टर विश्वासघाताचे वर्चस्व असलेल्या जगाचा सखोल वेध घेतला आहे. जिथे प्रत्येक निर्णयाला किंमत मोजावी लागते. रक्तांचलचा तिसरा सीझन दिनांक 16 जुलैपासून केवळ अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर स्ट्रीम होईल.
अॅक्शन-पॅक ट्रेलरने फ्रँचायझीच्या आतापर्यंतच्या सर्वात भयंकर अध्यायाचे दरवाजे उघडले आहेत. पळापळीत चार वर्षे घालवल्यानंतर, विजय सिंग आपला हाडाचा वैरी असलेल्या वसिम खानशी सूड उगवण्याच्या एकाच उद्देशाने गडद सावलीतून बाहेर येतो. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या शत्रुत्वाचे सर्वसमावेशक युद्धात रूपांतर होत असताना, हा संघर्ष केवळ विजय सिंग आणि वसिम खान यांच्यापेक्षा खूप मोठा होत जातो. सांकी पांडे पुन्हा रिंगणात उतरतात, तर सरस्वती देवी केंद्रस्थानी असतात. विरेंद्र प्रताप सिंग तसेच हिमांशू पटनायक यांच्या आगमनाने सत्तेचे संतुलन बदलत असल्याने राजकीय पटल अधिकाधिक अस्थिर होत जाते. स्पर्धा तीव्र स्वरूप धारण करताना राजकीय समीकरणे एकमेकांशी गुंतू लागतात, ट्रेलरमध्ये एक खिळवून ठेवणारी लढाई दिसते. जिथे प्रत्येक चाल महत्त्वाची असते आणि संघर्ष त्याच्या सर्वोच्च निर्णायक टप्प्यावर पोहोचतो.
विजय सिंग’चे विश्व पुन्हा आकाराला आणण्याबद्दल विचार मांडताना क्रांती प्रकाश झा म्हणाले, “विजय सिंग नेहमीच धैर्य आणि दृढनिश्चयाने प्रेरित राहिला आहे. इतक्या वर्षांनंतर ती भूमिका पुन्हा साकारण्यासाठी परतणे परिचित आणि रोमांचक दोन्ही वाटले. या सीझनमध्ये त्याला अशा परिस्थितीत ठेवले जाते जे सतत त्याच्या संकल्पाची कसोटी घेतात. ज्यामुळे प्रत्येक संघर्ष शेवटच्या संघर्षापेक्षा अधिक तीव्र होतो. फ्रँचायझीमध्ये यापूर्वी दाखवलेल्या सर्वात मोठ्या प्रदर्शनाच्या दिशेने तयार होणाऱ्या रोमांचक प्रवासाची चाहते अपेक्षा करू शकतात.”
वसिम खानच्या भूमिकेत परतणाऱ्या निकितिन धीरने आपले विचार मांडताना सांगितले, “पुन्हा एकदा वसिम खान साकारण्याची संधी अतिशय समाधानकारक म्हणावी लागेल. कारण या व्यक्तिरेखेला अनेक पदर आहेत. वास्तविक त्याचे (वसिमचे) जिथे पाऊल पडते, तिथे वर्चस्व गाजविण्यात तो यशस्वी ठरल्याचे प्रेक्षक अजूनपर्यंत पाहत आले आहेत. मात्र या सीझनमध्ये त्याच्यासमोर न चुकवता येणारी आव्हाने उभी राहतील. प्रेक्षकांनी आजवर जे वैर अनुभवले, ते या सीझनमध्ये पूर्णपणे नव्या ढंगात टिपेला पोहोचलेले दिसेल आणि त्यांच्यासमोर उलगडणाऱ्या प्रत्येक क्षणाची ते मजा घेतील, असं मला वाटते. ”
सूड उगविण्याची प्रत्येक चाल आणि शक्ती हेच अंतीम धन्यता बनत असताना, रक्तांचल सीझन 3 फ्रँचायझीला त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात स्फोटक अध्यायात उभे करते. क्यूंकी बदला अभी बाकी है… विजय और वसिम की इस जंग में बचेगा सिर्फ एक! (कारण सूड उगवायचा राहून गेलाय.. विजय आणि वसिमच्या लढाईत वाचेल कोणीतरी एकच!)
रक्तांचलचा 3 सीझन दिनांक 16 जुलैपासून केवळ अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर विनामूल्य स्ट्रीम होईल, जो मोबाईल उपकरणे, कनेक्टेड टीव्ही, अॅमेझॉन शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, जिओटीव्ही आणि एअरटेल एक्सस्ट्री
मवर उपलब्ध असेल.


