पुणे : दिवंगत श्री अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “मोफत जयपूर फूट अभियान – नवी चाल, नवा आत्मविश्वास” या उपक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) वितरण महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे महाशिबिर दि. २२ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत गुरुनानक दरबार गुरुद्वारा परिसर, कॅम्प, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या महाशिबिराचे आयोजन लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम, रामेश्वर मणियार आर्किटेक्ट्स, द अंबादास खोबरागडे आर्ट फाउंडेशन, इंडियन रेड क्रॉस सोसायटी (पुणे व अकोला) तसेच गुरुनानक मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.
या महाशिबिराला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राजी पवार यांनी उपस्थित राहण्यास सहमती दर्शविली आहे. अभियानाचे अध्यक्ष आर्किटेक्ट रामेश्वर मणियार, सह-अध्यक्ष दिलीपसिंह गोसल तसेच लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीमच्या अध्यक्षा आर्टिस्ट रजनी अंबादे यांनी त्यांची भेट घेऊन या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.
महाशिबिरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू दिव्यांग बांधवांना पूर्णपणे मोफत कृत्रिम पाय (जयपूर फूट), कृत्रिम हात तसेच विविध आवश्यक सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. दिव्यांगांना स्वावलंबी बनविणे, त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
या प्रकल्पाचे संचालन वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अस्मिता सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी डॉक्टर, तंत्रज्ञ आणि स्वयंसेवकांच्या टीमद्वारे करण्यात येणार असून लाभार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे.
मोफत “जयपूर फूट” नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क
• डॉ. अस्मिता सुराणा – ९८२२० ३७२०५
• रजनी अंबादे – ८७६६४ ७५५९७
• आकाश अंबादे – ९०४९० ०७१३६
• प्रकाश गवळी – ९८८१७ ४३४०७
• आर्किटेक्ट रामेश्वर मणियार – ८६९८९ ५१८८८
• सुशील मुंदडा – ८६८९८ २०४४४
या सेवा अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी गुरुनानक मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संतसिंग मोखा तसेच गुरुनानक दरबार गुरुद्वाराचे अध्यक्ष श्री चरणजीतसिंग सहानी यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटी, पुणेचे मानद सचिव श्री रमेश कुलकर्णी, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, अकोलाचे मानद सचिव श्री प्रभजीतसिंग बछेर, श्री संदीप पुंडकर आणि श्री प्रकाश गवळी हे देखील या सामाजिक अभियानासाठी सक्रिय सहकार्य करीत आहेत.
लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीमच्या वतीने डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन डॉ. अस्मिता सुराणा, सचिव लायन आकाश अंबादे, खजिनदार लायन नितीन धोत्रे, लायन रवीबाला काकतकर, लायन प्रशांत कानोजिया, लायन सूर्यकांत शाह, लायन सुशील मुंदडा, लायन सुधा धोत्रे, लायन सुनीता कुलकर्णी, लायन रमेश दोशी, लायन डॉ. राहुल सुराणा, लायन मकरंद येवतेकर , लायन संजना झामवर तसेच लायन आशा मणियार हे या सेवा अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. अधिकाधिक दिव्यांग बांधवांपर्यंत मोफत जयपूर फूट व सहाय्यक उपकरणे पोहोचविण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्य समर्पित भावनेने कार्य करीत आहेत.
आयोजकांनी सांगितले की, “महाराष्ट्र मोफत जयपूर फूट अभियान” राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये यशस्वीरीत्या राबविण्यात आले आहे. यापूर्वी परभणी, वाशीम, लातूर, अकोला, अमरावती आणि मंगळवेढा (पंढरपूर) येथे आयोजित शिबिरांमधून हजारो दिव्यांग बांधव लाभान्वित झाले आहेत. अमरावती येथे आयोजित शिबिरात विक्रमी १,१११ लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम हात व पाय प्रदान करण्यात आले होते.
या सेवा अभियानाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (पुणे शहर) चे कार्याध्यक्ष श्री प्रदीप देशमुख यांचेही मोलाचे सहकार्य व समर्थन लाभले आहे. त्यांनी या जनकल्याणकारी उपक्रमाचे स्वागत करत अधिकाधिक गरजू दिव्यांग बांधवांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
आयोजकांनी महाराष्ट्रातील सर्व गरजू दिव्यांग बांधवांना या महाशिबिराचा लाभ घेण्याचे तसेच अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचविण्याचे आवाहन केले आहे.


