Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedविश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत यांच्या तर्फे राष्ट्रधर्म पूजक...

विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत यांच्या तर्फे राष्ट्रधर्म पूजक – दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा- २०२४

पुणे, दि. २६ मार्च: विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत तर्फे महाराष्ट्र, राज्य कुस्तीगीर परिषद व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती प्रित्यर्थ लातूर येथील रामेश्वर (रुई) येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सोमवार, दि.१ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ विजेत्या मल्लास १ लाख रूपये रोख, चांदीची गदा, मेडल व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी कुस्ती खेळाडूसह क्रीडा प्रेमींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी केले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सोमवार, दि.१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. तसेच, पारितोषिक वितरण समारंभ याच दिवशी सायं. ७ वा. होणार आहे. समारंभास सुरभी मालिकेचे सादरकर्ते व ज्येष्ठ अभिनेते सिद्धार्थ काक, दैनिक भास्कर समूहाचे संपादक, प्रकाश दुबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग, महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम, त्रिमूर्ती केसरी कुस्ती सम्राट पै. अस्लम काझी हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रामेश्वर (रुई)चे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड हे प्रमुख मार्गदर्शक आहेत. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा होणार आहे.
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे हे १६वे वर्ष आहे. यासाठी महाराष्ट्रातील नामवंतासह देशभरातील मल्लांना निमंत्रीत केले आहे. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ विजेत्या मल्लास महाराष्ट कुस्ती महावीर हा अत्यंत बहुमानाचा किताब, रोख १ लाख रूपये, चांदीची गदा व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकास ७५ हजार रूपये, तृतीय क्रमांक ५० हजार आणि चतुर्थ क्रमांकास २५ हजार रूपये यासह वजनगट ५७, ६१, ६५, ७०, ७४, ८६ ते १२५ किलो वजन गटातील विजेत्या मल्लांना गटनिहाय हजारो रूपयांची पारितोषिके, सुवर्ण, रौप्य, कास्यं पदक, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचलेल्या सर्व कुस्तीगीरांना मानधन देण्यात येईल.

थोर स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रीय कीर्तनकार, आरोग्य शास्त्रातील एक महान चमत्कार, योग महर्षि शतायुषी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तंदुरूस्त अशा पंच्चाहत्तर वर्षे वयाच्या पुढील मल्लांसाठी याच दिवशी एक आगळी वेगळी कुस्तीस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना योग महर्षी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा स्मृती सुवर्ण, रोप्य, कांस्य गौरव पदक बहाल करण्यात येईल.
सर्व मल्लांची वजने रविवार दि. ३१ मार्च २०२४ रोजी सायं. ४ ते ८ पर्यंत घेतली जातील. सर्व कुस्तीगीरांनी आधारकार्डची मूळ प्रत व त्याची झेरॉक्स प्रत आणणे बंधनकारक आहे. स्पर्धा राज्य संघटनेच्या नियमानुसार घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही. स्पर्धेसाठी येणार्‍या निवडक कुस्तीगीरांच्या जाण्या येण्याचे एस.टी.भाडे, निवासाची व भोजनाची व्यवस्था संयोजकातर्फे करण्यात येईल.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रा.विलास कथुरे (मो.नं.९८५०२११४०४) व प्रा.डॉ. पी.जी. धनवे (मो.नं.९८२२६२६००६) यांच्याशी संपर्क साधावा.
या स्पर्धेत जास्तीत जास्त मल्लांनी सहभागी व्हावे. त्याच बरोबर क्रीडाप्रेमींनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धा संयोजन समितीचे सचिव प्रा. विलास कथुरे व प्रा.डॉ. पी.जी. धनवे यांच्यासह संयोजन समितीने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments