Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedयुरोकिड्सतर्फे 18-24 महिन्यांच्या मुलांसाठी ‘ज्युनिअर प्लेग्रुप’ हा नवीन प्रारंभिक शिक्षण कार्यक्रम सुरू

युरोकिड्सतर्फे 18-24 महिन्यांच्या मुलांसाठी ‘ज्युनिअर प्लेग्रुप’ हा नवीन प्रारंभिक शिक्षण कार्यक्रम सुरू

विशेष अभ्यासक्रम, तज्ज्ञ शिक्षक आणि सुरक्षित असं शिकण्याचं वातावरण यांचा समन्वय असलेला संशोधनाधारित प्रारंभिक शिक्षण कार्यक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया घालतो

मुंबई | 21 जुलै 2026: भारतातील आघाडीचा प्रीस्कूल ब्रँड युरोकिड्स प्रीस्कूलने आज ‘ज्युनिअर प्लेग्रुप’ या 18-24 महिन्यांच्या मुलांसाठी खास तयार करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या पहिल्याच सुसूत्र प्रारंभिक शिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करत असल्याची घोषणा केली. विशेष अभ्यासक्रम, तज्ज्ञ शिक्षक आणि सुरक्षित शिक्षण वातावरण यांवर आधारित हा कार्यक्रम बालविकासातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एका टप्प्याला सक्षम पाठबळ देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

पारंपरिकपणे भारतात प्रीस्कूल शिक्षणाची सुरुवात साधारणपणे अडीच ते तीन वर्षांच्या वयात होते. ‘ज्युनिअर प्लेग्रुप’ हा कार्यक्रम या दोन्ही टप्प्यांमधील अंतर भरून काढत मुलांच्या विकासातील महत्त्वाचे टप्पे गाठण्यास पूरक असे वयानुरूप शिक्षण वातावरण उपलब्ध करून देतो. हा कार्यक्रम शैक्षणिक अभ्यासक्रमाची लवकर सुरुवात करण्यावर भर देत नाही, तर संवादकौशल्य, हालचाल, जिज्ञासा, भावनिक सुरक्षितता आणि संज्ञानात्मक विकास आकर्षक, सहभागात्मक आणि विकासकेंद्रित उपक्रमांद्वारे घडवून आणण्यावर लक्ष केंद्रित करतो.

आजच्या पालकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला ‘ज्युनिअर प्लेग्रुप’ उपक्रम मुलांना सुरक्षित, प्रेमळ आणि प्रोत्साहनात्मक वातावरण उपलब्ध करून देतो. यामध्ये ते आत्मविश्वासाने आपल्या शिक्षणप्रवासाची सुरुवात करू शकतात आणि दिवसभर अर्थपूर्ण उपक्रमांमध्ये सहभागी राहू शकतात. याशिवाय, हा कार्यक्रम कुटुंबांना विज्ञानाधारित दृष्टिकोन पुरवितो. त्यायोगे मुलांमधील सामाजिक परस्परसंवादाला प्रोत्साहन मिळते, स्क्रीनवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होते आणि सुसूत्र प्रारंभिक शिक्षणाच्या अनुभवांद्वारे वयानुरूप विकासाला चालना मिळते.

लाइटहाऊस लर्निंग (युरोकिड्स)च्या प्री-के विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. एस. सेशासाई म्हणाले, “दीर्घकाळापासून बालपणातील प्रारंभिक शिक्षणाची सुरुवात मुलाच्या प्रीस्कूलमध्ये प्रवेशानंतरच होते अशी धारणा प्रचलित आहे. मात्र, विज्ञान आपल्याला सांगते की शिक्षणाची सुरुवात त्याही आधीपासून होते. आयुष्यातील पहिली दोन वर्षे ही मेंदूच्या विलक्षण विकासाची असतात आणि याच काळात संवादकौशल्य, जिज्ञासा, आत्मविश्वास आणि भावनिक स्वास्थ्याचा पाया रचला जातो.

‘ज्युनिअर प्लेग्रुप’च्या माध्यमातून आम्ही भारतातील प्रारंभिक शिक्षण व्यवस्थेतील एक महत्त्वाची उणीव भरून काढत आहोत. हा कार्यक्रम संशोधनाधारित असून विशेषतः लहान मुलांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. जिथे आपले मूल आत्मविश्वासाने शिक्षणप्रवासाची सुरुवात करू शकेल असे सुरक्षित आणि जिव्हाळ्याचे वातावरण शोधणारे काम करणारे पालक असोत किंवा मुलांच्या निरोगी विकासाला, सामाजिक संवादाला आणि जिज्ञासेला चालना देणारा विज्ञानाधारित कार्यक्रम शोधणारी कुटुंबे असोत आमचे उद्दिष्ट प्रत्येक मुलाला नव्यानव्या गोष्टी जाणून घेण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि आयुष्यभराच्या शिक्षणाचा पाया घालणारी मूलभूत कौशल्ये विकसित करण्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देणे हे आहे.”

‘ज्युनिअर प्लेग्रुप’च्या केंद्रस्थानी 30 आठवड्यांचा प्रगत अभ्यासक्रम असून त्यामध्ये 150 काळजीपूर्वक तयार केलेले शिक्षण अनुभव समाविष्ट आहेत. ते प्रत्येक मुलाच्या विकासप्रवासानुसार पुढे विकसित होत जातात. प्रत्येक 90 मिनिटांच्या सत्रात संवेदनाधारित अनुभव, हालचाली, कथाकथन, संवाद, दैनंदिन जीवनाशी संबंधित उपक्रम आणि सर्जनशील कृती यांचा समतोल साधला जातो. दिनचर्या आणि स्व-नियमन, संवाद, मेंदूचा विकास तसेच शोध आणि जिज्ञासा माध्यमातून या चार महत्त्वाच्या विकासस्तंभांवर मुलांची मूलभूत कौशल्ये विकसित केली जातात. हा कार्यक्रम बालशिक्षणाचे विशेष प्रशिक्षण घेतलेल्या बालशिक्षकांद्वारे 1:6 शिक्षक-मूल गुणोत्तरात राबवला जातो. प्रत्येक शिक्षकाला बालविकास, वयानुरूप अध्यापनपद्धती, वर्गातील अंमलबजावणी आणि सुरक्षितता याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच मुलांना टीयूव्ही नॉर्ड प्रमाणित केंद्रांमध्ये सुरक्षित, विश्वासार्ह आणि जिव्हाळ्याचे शिक्षण वातावरण उपलब्ध करून दिले जाते.

पारंपरिक प्रीस्कूल शिक्षण सुरू होण्यापूर्वीच सुसूत्र विकासात्मक अनुभवांविषयी पालकांमध्ये वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या बदलत्या प्रवाहाचे प्रतिबिंब म्हणून 18-24 महिन्यांच्या मुलांसाठी सुव्यवस्थित कार्यक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी युरोकिड्सकडे दर महिन्याला हजारो पालकांकडून चौकशी केली जाते. यावरून अशा समर्पित प्रारंभिक शिक्षण कार्यक्रमांची वाढती गरज अधोरेखित होते.

देशभरातील 2,000 हून अधिक युरोकिड्स केंद्रांमध्ये सुरू करण्यात येत असलेल्या ‘ज्युनिअर प्लेग्रुप’मध्ये मुलांच्या शिक्षणप्रवासाचा योग्य पाया घालण्यासाठी 450 वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण अनुभव समाविष्ट आहेत. सहभागी केंद्रांमध्ये प्रवेशप्रक्रिया आता सुरू झाली असून वर्गांना 20 जुलै 2026 पासून सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाची सविस्तर माहिती आणि प्रवेशासाठी पालकांनी आपल्या जवळच्या युरोकिड्स केंद्राशी संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments