Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाझा ची विशेष कव्हरसह ५० वर्षे साजरी; राष्ट्रीय आंबा दिनानिमित्त आंबा उत्पादक...

माझा ची विशेष कव्हरसह ५० वर्षे साजरी; राष्ट्रीय आंबा दिनानिमित्त आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार

नवी दिल्ली, २२ जुलै २०२६: भारताचे स्वदेशी, अब्जावधी डॉलर्सचे फळांवर आधारित पेय असलेले माझा विविध आमराईंमधून लाखो ग्राहकांपर्यंत भारतीय आंब्याची अस्सल चव पोहोचवण्याची ५० वर्षे साजरी करत आहे. राष्ट्रीय आंबा दिनानिमित्त कोका-कोला इंडिया आणि भारत सरकारच्या टपाल विभागाने माझाच्या ५० वर्षांच्या प्रवासाचा उत्सव साजरा करणारे एक ‘विशेष कव्हर’ प्रकाशित केले. या प्रसंगी आनंदना या कोका-कोला इंडिया फाउंडेशनच्या ‘प्रोजेक्ट उन्नती’शी संबंधित आंबा शेतकऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. त्यांच्या योगदानाने भारताचा आंब्याचा वारसा जपण्यास मदत झाली आणि माझाचा पाच दशकांचा प्रवास शक्य झाला, त्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शेतकरी समुदायाच्या योगदानाचा या निमित्ताने गौरव करण्यात आला.

या विशेष कव्हरचे प्रकाशन भारत सरकारचे माननीय केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री श्री चिराग पासवान यांच्या हस्ते, कर्नल अखिलेश कुमार पांडे, मुख्य पोस्टमास्टर जनरल, दिल्ली सर्कल, टपाल विभाग, दळण-वळण मंत्रालय; देवयानी राणा, उपाध्यक्ष – सार्वजनिक व्यवहार, दळण-वळण आणि शाश्वतता, कोका-कोला इंडिया आणि दक्षिण-पश्चिम आशिया; कोका-कोला इंडियाचे बॉटलिंग भागीदार; आंबा पुरवठादार फूड्स अँड इन्स लि. आणि स्वयंसेवी संस्था भागीदार सेंडेक्ट यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

माझा १९७६ मध्ये अनावरण झाल्यापासून भारतातील घराघरात परिचित झालेला ब्रँड आहे. तो संपूर्ण भारतातील बागांमध्ये पिकवलेल्या लाडक्या आंब्याची चव घेऊन येतो. हा ब्रँड मागील पाच दशकांपासून वर्षभर ग्राहकांना भारताच्या आवडत्या फळाच्या चवीशी जोडत आहे.

हे विशेष कव्हर एक चिरस्थायी टपाल तिकीट नोंद म्हणून काम करते. ते आंब्याच्या बागा आणि प्रतिष्ठित माझा बाटलीपासून प्रेरित असलेल्या एका चित्राच्या माध्यमातून माझाचा भारतीय आंब्याशी असलेला संबंध दर्शवते. ‘बाटलीतील आंब्याच्या ५० वर्षांचा उत्सव’ असे शीर्षक असलेली ही रचना, ब्रँडच्या पाच दशकांच्या प्रवासाला दर्शवते आणि त्यामागील शेतकरी समुदायांचा सन्मान करते.

या प्रसंगी बोलताना भारत सरकारचे माननीय केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री श्री. चिराग पासवान म्हणाले, “भारत अन्न उत्पादनात आत्मनिर्भर झाला आहे आणि पायाभूत सुविधा मजबूत करून व आपल्या शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेच्या संधींचा विस्तार करून अन्न प्रक्रियेद्वारे अधिक मूल्य निर्माण करणे हे आमचे पुढील प्राधान्य आहे. आमचे शेतकरी हे आमचे ‘अन्नदाते’ आहेत आणि कृषी मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न ही त्यांच्या भविष्यातील गुंतवणूक आहे. माझासारखे स्वदेशी पेय ब्रँड, शेतकऱ्यांना पाठिंबा देत आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत योगदान देत भारताच्या लाडक्या ‘आम’चा अस्सल स्वाद लाखो घरांपर्यंत पोहोचवून त्याचा हा वारसा साजरा करत आहेत, हे पाहणे उत्साहवर्धक आहे. टपाल विभागाद्वारे या विशेष कव्हरचे प्रकाशन हे भारताच्या आंब्याच्या वारशाला आणि तो टिकवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेली मानवंदना आहे.”

कोका-कोला इंडिया आणि दक्षिण-पश्चिम आशियाचे एकात्मिक कार्यान्वयन विभागाचे उपाध्यक्ष संदीप बाजोरिया म्हणाले, “मागील पाच दशकांपासून माझाने हापूससह इतर भारतीय आंब्यांची अस्सल चव लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे देशाचे आवडते फळ वर्षभर उपलब्ध होते. भारतीय आंब्यांच्या स्वादिष्ट चवीत रुजलेल्या माझाने खरेदी, तंत्रज्ञान सहाय्य आणि मूल्य साखळी भागीदारीद्वारे भारतीय शेतकरी कुटुंबांना विनम्रपणे पाठिंबा देताना पिढ्यानपिढ्या ग्राहकांशी एक अतूट नाते निर्माण केले आहे. हा टप्पा खरेदी आणि प्रक्रियेपासून ते बॉटलिंग आणि वितरणापर्यंतच्या कार्यक्षम मूल्य साखळीचा पुरावा आहे. ती आमची उत्पादने देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचतील, याची खात्री करते. टपाल विभागाकडून मिळालेले हे विशेष कव्हर गेल्या ५० वर्षांपासून हा सामायिक प्रवास आणि तो शक्य करणाऱ्या परिसंस्थेचा गौरव आहे.”

एसएलएमजी बेवरेजेसचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक,परितोष लधानी म्हणाले, “माझाच्या प्रत्येक बाटलीमागे शेतकरी, प्रक्रिया युनिट्स, उत्पादन सुविधा, ट्रकचालक, वितरक आणि किरकोळ विक्रेते यांच्या रोजच्या एकत्रित प्रयत्नांनी चालणारी एक अखंड मूल्य साखळी आहे. एका विश्वासार्ह आणि कार्यक्षम पुरवठा साखळीद्वारे आंब्याची अस्सल चव लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आमची भूमिका बजावताना आम्हाला अभिमान वाटतो. माझा आपली ५० वर्षे साजरी करत असताना हे श्रेय संपूर्ण परिसंस्थेतील त्या प्रत्येक व्यक्तीला जाते ज्यांच्या प्रयत्नांमुळे माझा हे नाव संपूर्ण भारतात घरोघरी पोहोचले आहे.”

हे खास कव्हर माझा च्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचाच एक भाग आहे. त्यात ‘50 साल से, सिप-सिप में आम’ या राष्ट्रीय मोहिमेचा समावेश होता आणि हा भारताचे राष्ट्रीय फळ व त्यामागील शेतकऱ्यांसोबतच्या ब्रँडच्या पन्नास वर्षांच्या संबंधांचा एक चिरस्थायी गौरव आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments