Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्रॅण्ड शॉप्सी मेलाच्या चौथ्या पर्वात नवीन ग्राहक व विक्रेत्यांच्या वाढीची दुपटीने उसळी

ग्रॅण्ड शॉप्सी मेलाच्या चौथ्या पर्वात नवीन ग्राहक व विक्रेत्यांच्या वाढीची दुपटीने उसळी

~ शॉप्सीच्या वर्षातील सर्वांत मोठ्या खरेदी महोत्सवामध्ये ग्राहकांच्या संख्येत व ऑर्डर्समध्ये दुपटीहून अधिक वाढ
~ टीशर्ट्स, साड्या, बेडशीट्स आणि कुर्ती यांना सर्वाधिक मागणी
~ ग्रॅण्ड शॉप्सी मेलाच्या चौथ्या पर्वातील विक्रेता वाढीने मारली दुपटीने उसळी
बेंगळुरू – मार्च २६, २०२४: शॉप्सी बाय फ्लिपकार्ट ह्या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अतिरिक्तमूल्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने ग्रॅण्ड शॉप्सी मेला ह्या खरेदी महोत्सवाच्या १२ ते १७ मार्चदरम्यान झालेल्या चौथ्या पर्वाची सांगता केली आहे. ह्यादरम्यान ग्राहकांना किमतीचे पुरेपूर मूल्य देणारी उत्पादने परवडण्याजोगी किमतीत देऊ करण्यात आली. ह्यासाठी शॉप्सीने मोफत डिलिव्हरी व उत्तम किमतींसह १६ कोटींहून अधिक उत्पादने उपलब्ध करून दिली होती. हे ग्रॅण्ड शॉप्सी मेलाचे चौथे पर्व होते आणि दैनंदिन मागणी व नवीन ग्राहक ह्या दोन्ही आघाड्यांवर ह्यात दुपटीहून अधिक वाढ दिसून आली.
देशाच्या दुर्गम भागांना सेवा पुरवणाऱ्या शॉप्सीने, कटक, गुवाहाटी, गोरखपूर व म्हैसूर ह्यांसारख्या श्रेणी दोन व श्रेणी तीन बाजारपेठांमधून ग्राहक मागणीत मोठ्या वाढीची नोंद केली आहे. ह्या बाजारपेठा महोत्सवादरम्यान महत्तपूर्ण योगदान देणाऱ्या बाजारपेठा ठरल्या. यातील ४१ टक्के नवीन वापरकर्ते प्रथमच खरेदी करणारे होते, तर ६० टक्क्यांहून अधिक ग्राहक श्रेणी ३+ शहरांतील होते. श्रेणी २+ शहरांतील ग्राहकांनी चॉपर्स, किड क्लोदिंग, इय बड्स आणि फॅशन वेअरेबल्सची खरेदी ह्या महोत्सवादरम्यान सर्वाधिक प्रमाणात केली, पुरुषांकडून टी-शर्ट्स आणि शूजची खरेदी सर्वाधिक झाली, तर स्त्रियांमध्ये कुर्ती, साड्या आणि इयररिंग्जच्या खरेदीचे प्रमाण सर्वाधिक होते. हा ग्रॅण्ड शॉप्सी मेला महोत्सवाला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांच्या संख्येत यामुळे १.४ पटींनी वाढ झाली. विक्रीच्या अखेरच्या दिवशी, शॉप्सीने आपल्या प्लॅटफॉर्मवरील सर्वाधिक ट्रॅफिकची नोंद केली. त्यामुळे हा उपक्रम प्लॅटफॉर्मच्या सर्वांत यशस्वी उपक्रमांपैकी एक ठरला.
ऑरगंझा साड्या, स्मार्ट वॉचेस आणि इयरबड्सची हे सर्वाधिक शोधले गेलेले कीवर्ड्स होते. ह्यातून ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण आवडीनिवडी व प्राधान्यक्रम दिसून येतात. चॉपर्स, वॉटर बॉट्ल्स आणि लिपस्टिक्स ह्यांसारख्या वेगळ्या उत्पादनांना असलेली मागणीही ह्या उपक्रमादरम्यान वाढल्याचे शॉप्सीने नोंदवले आहे. विविध प्रवर्गांमध्ये उत्तम किमतीची उत्पादने देऊन शॉप्सी आपल्या ग्राहकवर्गाच्या वैविध्यपूर्ण गरजांची पूर्तता करतो. ७९ रुपयांहून कमी किमतीचे टीशर्ट्स, १२९ रुपयांचा पुरुषांचे शूज, ८५ रुपयांपासून साड्या, स्वयंपाकघरातील उत्पादने १९ रुपयांपासून, घड्याळे ३३ रुपयांपासून आणि बेडशीट्स १२९ रुपयांपासून ह्या ऑफर्स विशेष लोकप्रिय ठरल्या.
दर तासाला नवीन ऑफर्स आणून, ‘ग्रॅण्ड शॉप्सी मेला’ने ग्राहकांना अनेक रोमांचक सरप्राइजेसही दिली. ह्यात सर्व उत्पादनांसाठी प्राइस क्रॅश अँड लूट आवर्स आणि इअररिंग्ज व रुमाल ठराविक वेळात १ रुपयाला उपलब्ध करून देणाऱ्या झटपट डील्स ह्यांसारख्या मर्यादित वेळापुरत्या अतिरिक्त ऑफर्सचा समावेश होता. शॉप्सीने नवीन ग्राहकांना विक्रीच्या किमतीवर ४० रुपयांच्या अतिरिक्त ऑफर्सही दिल्या.
शॉप्सीचा भर भारतातील विक्रेता परिसंस्था सक्षम करण्यावर कायम आहे. सर्व भौगोलिक प्रदेशांतील विक्रेत्यांचा सहभाग वाढला आहे. दिल्ली एनसीआर, सुरत, जयपूर, पानिपत आणि राजकोट ही शहरे विक्रेता विस्तारात आघाडीवर आहेत. विक्रेत्यांनी ह्या महोत्सवात सहभाग घेतल्यामुळे त्यांची वाढ दुपटीने वाढली, काही जणांनी तर तिप्पट वाढीचा अनुभव घेतला. गृहोपयोगी उत्पादने विकणारे ह्यात आघाडीवर होते. त्यांच्या उत्पादनांना सातत्याने भरघोस मागणी होती व त्यातून लक्षणीय उत्पन्न कमावले जात होते. शिवाय, हिसार, सागर, फतेहाबाद, सतना व सनगनेर ह्यांसारख्या दुर्गम भागातील शहरांचे योगदान ह्यात मोठे होते. हा महोत्सव यशस्वी करण्यातील छोट्या शहरांचे योगदान ह्यातून अधोरेखित होते.
फ्लिपकार्टच्या शॉप्सीचे प्रमुख कपिल थिरानी ग्रॅण्ड शॉप्सी मेलादरम्यान निरीक्षणास आलेल्या कलांबाबत म्हणाले, “ग्राहकांना एक बटन दाबून वैविध्यपूर्ण उत्पादनांची अद्वितीय उपलब्धता परवडण्याजोग्या किमतींमध्ये पुरवून भारताचा खरेदीचा अनुभव बदलून टाकणे हेच शॉप्सीचे उद्दिष्ट आहे. आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा पुरवण्याप्रती आमच्या बांधिलकीचे सार ग्रॅण्ड शॉप्सी मेलामध्ये सामावले आहे. ग्राहक मनापासून खरेदीचा आनंद लुटण्यासाठी व त्यांच्या इच्छा कोणत्याही मर्यादेशिवाय पूर्ण करण्यासाठी अशा मोठ्या खरेदी महोत्सवांची आतूरतेने वाट बघत असतात. ग्रॅण्ड शॉप्सी मेलासारख्या उपक्रमांची आतूरतेने वाट बघणाऱ्या स्थानिक व्यवसायांना व विक्रेत्यांना सहाय्य करत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. ह्याद्वारे आर्थिक संधी व मूल्य दोन्हीला बढावा देणे शक्य होते. पुढे जात असताना, आमच्या ग्राहकांना उपलब्धता व निवडीची संधी अधिकाधिक देण्याप्रती आमची बांधिलकी दृढ आहे. त्याचबरोबर ग्रॅण्ड शॉप्सी मेलासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून उत्तम किमतींना उत्पादने उपलब्ध करून देण्यास आम्ही प्रयत्नशील असतो.”

२०२१ मध्ये स्थापना झाल्यापासून शॉप्सी भारतभर ई-कॉमर्स जास्तीतजास्त लोकांना उपलब्ध करून देण्यात तसेच श्रेणी-२+ शहरांतील ग्राहकांना अतिरिक्त मूल्य पुरवण्यात अग्रेसर आहे. शून्य-कमिशन बाजारपेठ मॉडेल देऊन शॉप्सीने भारतात अतिरिक्तमूल्य वाणिज्याचा प्रसार केला आहे. प्लॅटफॉर्मचा विस्तार २०२४ मध्ये कायम असल्यामुळे, आम्ही ग्राहकांना तसेच देशभरातील विक्रेत्यांना अद्वितीय मूल्य व उपलब्धता पुरवण्यास वचनबद्ध आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments