Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedअखिल भारतीय विद्यार्थी परिषद पिंपरी चिंचवड आयोजित वृंदावन होळी फेस्ट मोठ्या उत्साहात...

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पिंपरी चिंचवड आयोजित वृंदावन होळी फेस्ट मोठ्या उत्साहात साजरा.*

सोमवार दिनांक 25 मार्च रोजी पिंपरी चिंचवड मधील रावेत येथे होळी-धुलीवंदनाच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पिंपरी चिंचवड महानगराच्या वतीने “वृंदावन होळी फेस्ट” चे आयोजन करण्यात आले होते.

एकंदरीत भारतीय सण उत्सवांचे बदलते स्वरूप आणि त्यातल्या त्यात होळी धुलीवंदन या सणांचे विकृतीकरण या गोष्टीला देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पिंपरी चिंचवड महानगर शाखेच्या वतीने ड्रग फ्री व अल्कोहोल फ्री होली अशा टॅगलाईन खाली वृंदावन होली फेस्ट भरवण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये २००० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमा मध्ये इस्कॉन प्रस्तुत वृंदावन भजन, भारतीय पारंपारिक वाद्ये केरळ बँड, सोलापुरी हलगी, संबळ यासोबतच लाईव्ह डी जे. असे मुख्य आकर्षण होते. या सर्व प्रकारास उपस्थितांनी विविध वाद्यांच्या तालावर भरभरून दाद दिली.

यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, विधान परिषद आमदार उमाताई खापरे, अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. शिल्पा जोशी, प्रदेश सहमंत्री श्रेया चंदन, मराठी पत्रकार संघाचे विभागीय सचिव नानासाहेब कांबळे, उद्योजक दिपक भोंडवे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, केशव घोळवे, बाळासाहेब ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते अनुप मोरे, संजिविनी पांडे, बांधकाम व्यावसायिक दिलीप सोनिगरा, प्रताप बारणे, सोमनाथ भोंडवे, महिलांचे व्यासपीठ प्रयास ग्रुपच्या शोभा निसळ, माधुरी कवी, चंद्रकला शेडगे, महानगर अध्यक्ष प्रा.निलेश बिराजदार, महानगर मंत्री सिद्धेश्वर लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरातील सर्व विद्यार्थी कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments