Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedरोमहर्षक टोकियो ई-प्रिक्स स्पर्धेत महिंद्रा रेसिंगच्या निक डी व्रीजची धमाकेदार घोडदौड; पटकावला...

रोमहर्षक टोकियो ई-प्रिक्स स्पर्धेत महिंद्रा रेसिंगच्या निक डी व्रीजची धमाकेदार घोडदौड; पटकावला शानदार विजय

 

 

 

 

२७ जुलै २०२६: महिंद्रा रेसिंगने आठवड्याच्या अखेरीस (वीकेंडला) एकूण ३८ गुण मिळवून टोकियोचा निरोप घेतला. आव्हानात्मक अशा ओल्या-सुक्या ट्रॅकवरील शर्यतीत निक डी व्रीजने टोकियो ई-प्रिक्स स्पर्धेत या हंगामातील आपला दुसरा आणि फॉर्म्युला ई कारकिर्दीतील सहावा विजय मिळवला. दुसरीकडे, त्याचा सहकारी एडुआर्डो मोर्ताराने या हंगामातील विक्रमी चौथ्या पोल पोझिशनची बरोबरी केली, परंतु शर्यतीचा शेवटचा टप्पा असताना एका दुर्घटनेमुळे त्याला दुर्दैवाने शर्यतीतून बाहेर पडावे लागले.

 

 

 

२०२५/२६ एफआयए फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या १४व्या आणि १५व्या फेऱ्यांदरम्यान संपूर्ण वीकेंडला पावसाचे सावट होते. रविवारी झालेल्या दुसऱ्या शर्यतीत या बदलत्या हवामानामुळे परिस्थितीचा अंदाज लावणे निश्चितच कठीण झाले होते.

 

दोन्ही सराव सत्रांमध्ये अव्वल स्थान पटकवल्यानंतर, एडुआर्डो मोर्तारा शनिवारी झालेल्या वीकेंडच्या पहिल्या शर्यतीसाठी दुसऱ्या स्थानावर शर्यतीस सज्ज झाला होता. बहुतांश शर्यतीत पोडियमच्या (पहिले तीन क्रमांक) शर्यतीत राहिल्यानंतर अखेर तो पाचव्या स्थानावर राहिला. दरम्यान, डी व्रीज पहिल्याच फेरीत पंक्चर झाल्यामुळे त्यातून सावरू शकला नाही आणि त्याला १७व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

 

रविवारी, मोर्ताराची एका लॅपमधील उल्लेखनीय गती पुन्हा एकदा दिसून आली, जेव्हा त्याने ‘ड्यूएल्स’ टप्प्यावर वर्चस्व गाजवले. फायनलमध्ये दा कोस्टाला सेकंदाच्या सहा दशांशांनी पछाडत त्याने या वर्षातील चौथी पोल पोझिशन मिळवली. यासह एकाच फॉर्म्युला ई हंगामात सर्वाधिक पोल मिळवण्याच्या विक्रमाची बरोबरी करत त्याने स्वतःचे आणि टीमचे नवे विक्रम प्रस्थापित केले. डी व्रीजनेही ड्यूएल्समध्ये प्रवेश केला आणि वीकेंडच्या दुसऱ्या शर्यतीसाठी ग्रिडवर पाचव्या स्थानावरून सुरुवात केली.

 

ओल्या हवामानात चालकांना पाहणी लॅपचा अनुभव मिळवून देत शर्यत ‘सेफ्टी कार’च्या मागे सुरू झाली. शर्यत सुरू होताच मोर्ताराने आपल्या स्थानाचा फायदा घेत सुरुवातीलाच आघाडी घेतली, तर डी व्रीज सुरुवातीलाच सातव्या स्थानावर मागे फेकला गेला.

 

दुसऱ्या स्थानावर पाठोपाठ धावणाऱ्या दा कोस्टाने ३ऱ्या लॅपमध्ये लवकर ‘अटॅक मोड’ लागू केला आणि मोर्ताराला वेगाने दुसऱ्या स्थानावर ढकलले. दरम्यान, सुकणाऱ्या ट्रॅकसाठी निवडलेल्या टायर्सच्या हवेच्या दाबामुळे अडचणीच्या परिस्थितीत संघर्ष करत डी व्रीज स्पर्धकांच्या गर्दीत आणखी मागे फेकला गेला.

 

१४व्या लॅपमध्ये, मोर्ताराने आपला पहिला अटॅक मोड लागू केला, ज्यामुळे तो दा कोस्टाच्या एका सेकंदाच्या अंतरापर्यंत जवळ पोहोचला; परंतु तो ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच ‘फुल कोर्स यलो’मुळे शर्यत काही काळासाठी तटस्थ झाली.

 

शर्यत पुन्हा सुरू झाल्यावर, मोर्तारा जवळ होता, परंतु त्याला आघाडी मिळवता आली नाही आणि टायर्सचा दाब हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरल्याने तो रेसमध्ये मागे फेकला जाऊ लागला. दरम्यान, मागे असलेल्या डी व्रीजने त्याच्या ‘अटॅक मोड’च्या पहिल्या दोन मिनिटांचा वापर करून सहाव्या स्थानावर झेप घेतली.

 

त्यानंतर २६व्या लॅपमध्ये, डी व्रीजला त्याच्या उर्वरित ६ मिनिटांचा अटॅक मोड लागू करण्याची वेळ आली, ज्याचा वापर करून त्याने आघाडीच्या रेसर्सना पछाडत थेट अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे, मोर्तारा १० व्या स्थानावर मागे घसरला होता आणि त्याने आपला दुसरा अटॅक मोड सक्रिय केला.

 

शेवटच्या लॅप्स दरम्यान, मोर्तारा अनेक गाड्यांचा समावेश असलेल्या एका दुर्घटनेत अडकला, ज्यामुळे त्याची शर्यत संपुष्टात आली आणि ‘रेड फ्लॅग’ दाखवण्यात आला.

 

त्यामुळे चेकर्ड फ्लॅगपर्यंतच्या एका लॅपच्या अंतिम चुरशीत निक कॅसिडी आणि जेक डेनिस

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments