Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedनरपतगिरी चौक ते मालधक्का चौक मार्गावरील पार्किंग व्यवस्थेत बदल*

नरपतगिरी चौक ते मालधक्का चौक मार्गावरील पार्किंग व्यवस्थेत बदल*

 

 

 

पुणे, दि. २८ (जिमाका): पुणे शहरातील समर्थ वाहतूक विभागाच्या हद्दीतील नरपतगिरी चौक ते मालधक्का चौक या मार्गावर सुरू असलेल्या कामामुळे रस्त्यावर पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहावी, यासाठी या मार्गावरील पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधिसूचनेनुसार तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित तरतुदींन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी करण्यात आला आहे.

 

यानुसार समर्थ वाहतूक विभागांतर्गत नर्पतगिरी चौक ते मालधक्का चौक या मार्गावर खालीलप्रमाणे पार्किंग व्यवस्था लागू करण्यात आली आहे नरपतगिरी चौक ते मालधक्का चौक (डाव्या बाजूस) दुचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था (फुटपाथलगत), अंदाजे ३५० मीटर.

 

नरपतगिरी चौक ते मालधक्का चौक (उजव्या बाजूस) : चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, अंदाजे ३५० मीटर.

नागरिकांनी व वाहनचालकांनी नव्याने लागू करण्यात आलेल्या पार्किंग व्यवस्थेचे पालन करावे. तसेच वाहतूक पोलीस अधिकारी, कर्मचारी व मदतनीस यांना सहकार्य करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments