Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedपंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ३० जुलै रोजी दौंड येथे* *७...

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ३० जुलै रोजी दौंड येथे* *७ नामांकित उद्योजकांचा सहभाग; १४३ हून अधिक रिक्त पदांसाठी थेट मुलाखती*

 

 

पुणे, दि. २८ (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे आणि नायगाव एज्युकेशन सोसायटीचे दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय, दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय, सावरकर नगर, लिंगाळी रोड, दौंड (ता. दौंड, जि. पुणे) येथे करण्यात आले आहे.

 

या रोजगार मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील ७ उद्योजकांनी सहभाग नोंदविला असून १४३ हून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. हेल्पर, ट्रेनी, सेंटर मॅनेजर, रिलेशनशिप ऑफिसर, सेल्स अँड मार्केटिंग, सेवा सारथी, ट्रेनर, कोऑर्डिनेटर आदी विविध पदांसाठी पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

 

इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांची सविस्तर माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर पाहून संबंधित पदांसाठी अर्ज करावा. तसेच दि. ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून प्रत्यक्ष मुलाखतीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

मुलाखतीस येताना उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, अद्ययावत बायोडाटा (Resume) तसेच आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.

 

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, सरदार मुदलियार रोड, पुणे – ४११०११ येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने कळविले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments