पुणे, दि. २८ (जिमाका) : श्री क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ११५ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून वाहतूक नियमनाचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार दि. २८ जुलै २०२६ रोजी रात्री ११.०० वाजल्यापासून ते दि. २९ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत संबंधित मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार असून वाहने पुढील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत.
पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे कापूरहोळ येथून सासवडकडे जाणारी वाहतूक कापूरहोळ येथून बेंगळुरू महामार्गमार्गे कात्रज चौक किंवा सारोळा–वीर मार्गे सासवडकडे वळविण्यात येईल.
सासवड येथून कापूरहोळकडे जाणारी वाहतूक सासवड–वीर मार्गे सारोळा येथून कापूरहोळकडे जाईल.
जिल्हा प्रशासनाने वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
00000


