Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedवी फाउंडेशन आणि एरिक्सनचा 'रोबोट्सव', वर्गाच्या चार भिंतींच्या पलीकडे करणार रोबोटिक्स शिक्षणाचा...

वी फाउंडेशन आणि एरिक्सनचा ‘रोबोट्सव’, वर्गाच्या चार भिंतींच्या पलीकडे करणार रोबोटिक्स शिक्षणाचा विस्तार

एरिक्सनच्या सहयोगाने चालवण्यात येणार असलेल्या रोबोटिक्स लॅब प्रोग्राममध्ये देशभरातील विद्यार्थ्यांना त्याच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रोबोटिक्स आणि एआयसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार

 

वोडाफोन आयडियाचा सीएसआर उपक्रम ‘वी फाउंडेशन’ ने, एरिक्सन कंपनीच्या सहयोगाने ‘रोबोट्सव: द फेस्टिवल ऑफ टेक्नॉलॉजी’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एकत्र येऊन शिकण्याचे हे एक हक्काचे व्यासपीठ आहे, ज्याचा मुख्य उद्देश तरुण विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना, सर्जनशीलता आणि ‘स्टेम’ (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) शिक्षणाविषयीची आवड निर्माण करणे हा आहे. हा उपक्रम ‘रोबोटिक्स लॅब प्रोग्राम’चा एक भाग म्हणून राबवला जात आहे. यासाठी आमचे नॉलेज पार्टनर ‘मोईनी फाउंडेशन’च्या सहकार्याने आज ‘रोबोट्सव’च्या अधिकृत वेबसाईटचे (https://robotsav.org/) लोकार्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटिंग, प्रोग्रामिंग, वर्च्युअल रिअॅलिटी आणि जनरेटिव एआय यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष आणि व्यावहारिक अनुभव देणे हा याचा उद्देश आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी शिक्षण दिले जाईल. विविध स्पर्धा आणि सामूहिक उपक्रमांच्या माध्यमातून ‘रोबोट्सव’ अतिशय रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या अद्भुत जगाची ओळख करून देईल.

 

‘रोबोट्सव’च्या वेबसाईटवर देशभरातील विद्यार्थी क्विझ आणि निबंध लेखन यांसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतात. तसेच रोबोटिक्स, एआय आणि इतर नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल आपली समज अधिक दृढ करण्यासाठी ते विविध ब्लॉग आणि खास तयार केलेली शैक्षणिक साधने देखील पाहू शकतात. एक ओपन डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून डिझाइन केलेली ही वेबसाईट विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या गतीने शिकण्याची, उपक्रमांमध्ये गुंतून राहण्याची आणि कौशल्ये विकसित करण्याची सुविधा देते. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत एकत्र काम करण्यासाठी अजून जास्त संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, येत्या काही महिन्यांत ‘रोबोट्सव’ अंतर्गत ऑफलाइन स्पर्धा देखील सुरू केल्या जातील.

 

या उपक्रमाविषयी बोलताना वोडाफोन आयडियाच्या चीफ रेग्युलेटरी आणि कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर आणि ‘वी फाउंडेशन’च्या संचालक श्रीमती अंबिका खुराना म्हणाल्या, “रोबोटिक्स आणि एआयचे शिक्षण तरुण विद्यार्थ्यांसाठी अधिक रंजक आणि सुलभ बनवून व्यापक ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेत योगदान देण्याच्या आमच्या विविध प्रयत्नांमधील ‘रोबोट्सव’ हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. ‘रोबोटिक्स लॅब प्रोग्राम’च्या माध्यमातून आम्हाला हे दिसून आले आहे की, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास निर्माण करू शकतो. ‘रोबोट्सव’ वेबसाईट देशभरातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या या सतत बदलणाऱ्या जगाचा अभ्यास करण्यासाठी, स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी एक सहज सुलभ व्यासपीठ उपलब्ध करून देते आणि आमच्या या प्रयत्नांना अधिक बळ देते. जास्तीत जास्त तरुण मनांना नवकल्पना शोधण्यासाठी आणि ‘स्टेम’ शिक्षणाची आपली आवड जोपासण्यासाठी प्रेरित करणे, हाच आमचा मुख्य उद्देश आहे.”

 

या उपक्रमाबाबत बोलताना एरिक्सन इंडियाचे हेड ऑफ सस्टेनेबिलिटी आणि कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी सहर्ष सायमन डेव्हिड म्हणाले, “विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शोधण्यासाठी, नवकल्पना शोधण्यासाठी आणि तंत्रज्ञानाचा कल्पकतेने वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणारे ‘रोबोट्सव’ हे एक अतिशय प्रभावी व्यासपीठ आहे. तरुण विद्यार्थ्यांना अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच रोबोटिक्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची ओळख करून देऊन, त्यांच्यातील उत्सुकता वाढवणे, समस्या सोडवण्याची त्यांची क्षमता बळकट करणे आणि पुढील पिढीतील नवकल्पकांना प्रेरित करणे, हाच आमचा प्रयत्न आहे. ‘वी फाउंडेशन’सोबतची आमची भागीदारी ही देशभरातील विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान अधिक अर्थपूर्ण आणि सुलभ बनवण्याच्या आमच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”

 

सात राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या २० रोबोटिक्स लॅब्जच्या माध्यमातून, ‘रोबोटिक्स लॅब प्रोग्राम’ने देशातील जवळपास १०,००० विद्यार्थ्यांवर आपला सकारात्मक प्रभाव निर्माण केला आहे. ‘रोबोट्सव’ वेबसाईटच्या माध्यमातून, ‘वी फाउंडेशन’ आणि एरिक्सन यांचे उद्दिष्ट हे यश अधिक पुढे नेणे आणि भारतातील पुढील पिढीतील तंत्रज्ञान क्षेत्रातील नवकल्पकांना प्रोत्साहित करणे हे

आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments