Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedतरुणांनी चांगले कार्य केल्यास भारत सुपर पॉवर होईल.-- मठाधीपती भाऊंमहाराज.

तरुणांनी चांगले कार्य केल्यास भारत सुपर पॉवर होईल.– मठाधीपती भाऊंमहाराज.

 

पुणे -दिनांक — 29 जुलै 2026– तरुणांनी चांगले कार्य करून देशाची सेवा केली तर, भारत येत्या 25 वर्षात सुपर पॉवर देश होईल. असे गोवा येथील श्री सद्गुरू पारवडेश्वर महाराज ट्रस्टचे मठाधीपती भाऊंमहाराज यांनी आज बुधवारी एका कार्यक्रमात व्यक्त केले.

ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त वडगाव बुद्रुक येथील ऐशवर्या

बँकेट हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या नाथ पुरस्कार वितरण सोहळ्यात मठाधीपती भाऊ महाराज बोलत होते. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब अमराळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे, उपाध्यक्ष दिपक दाते समन्वयक संजय मिराशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते काका चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार विश्वजित कदम यांना मच्छिन्द्रनाथ पुरस्कार, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांना गोरक्षनाथ पुरस्कार, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य ऍड. गणेश शिरसाट यांना कानिफनाथ पुरस्कार,पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांना जालिंदरनाथ पुरस्कार,शिलाई वर्ल्डचे संचालक व प्रसिद्ध उद्योजक दादासाहेब गुजर यांना भर्तरीनाथ पुरस्कार,आग्रा – रायगड गरुड झेपचे मारुती गोळे यांना रेवणनाथ पुरस्कार,प्रसिद्ध शिल्पकार विशाल ताजणेकर यांना गहिनीनाथ पुरस्कार,इतिहास तज्ज्ञ डॉ नंदकिशोर मते यांना नागनाथ पुरस्कार व भैरवनाथ ग्रुपचे संचालक व उद्योजक विजय भगत यांना चर्पटीनाथ पुरस्कार, तसेंच प्रसिद्ध चित्रकार व निवेदक सौ. अंजली सावंत – देशपांडे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांना शौर्य पुरस्कार मठाधीपती भाऊ महाराज व युवराज सोहमराजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप होते. यंदा पुरस्कार वितरण सोहळ्याचे 26 वे वर्ष होय.

भाऊंमहाराज याप्रसंगी बोलताना म्हणाले की, तरुण पिढी भारताचा आत्मा आहे. या पिढीकडून मोठया प्रमाणावर अपेक्षा आहे. त्यांनी चांगले कार्य केल्यास देशसेवा मोठया प्रमाणात होईल. त्यामुळे भारत 25 वर्षात महासत्ता होईल अशी अपेक्षा आहे.

याप्रसंगी माजी महापौर प्रशांत जगताप, श्री राजेंद्र कोंढरे, नंदकिशोर मते आदी मान्यवरांची भाषणे झाली.

श्री बाळासाहेब अमराळे यांनी प्रास्ताविक तर दाते व मिराशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments