Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*वाहनांबाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देण्याबाबत अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी*

*वाहनांबाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देण्याबाबत अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी*

 

 

पुणे, दि.29: भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार पुणे ग्रामीण जिल्हयात जुनी वाहने खरेदी विक्री करणारे व्यावसायिकांनी त्यांच्याकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देण्याबाबतचे अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी आदेश जारी केले आहे.

 

पुणे ग्रामीण जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न दिल्यास असे व्यावसायिक हे भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील. स्थानिक पोलीस स्टेशनने याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments