Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedघरमालकांनी भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला सादर करण्याबाबत अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी*

घरमालकांनी भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला सादर करण्याबाबत अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी*

 

 

पुणे, दि. 29: भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार पुणे ग्रामीण जिल्हयातील घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरु ठेवताना संबंधित भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन यांचेकडे सादर करण्याबाबतचे अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी आदेश जारी केले आहे.

 

पोलीस स्टेशनला माहिती देतांना भाडेकरुचे संपूर्ण नाव, सद्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन छायाचित्रे, त्यांना ओळखणा-या व्यक्तींचे नाव व पत्ता, घरभाडे करारनामा, ओळखपत्र आदी कागदपत्रे सादर करावी. माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न दिल्यास भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ प्रगाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील. स्थानिक पोलीस स्टेशनने याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करावी

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments