Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedटीसीएस इनक्विझिटिव्ह २०२६ च्या पुणे फेरीचे विजेतेपद दिल्ली पब्लिक स्कूलने पटकावले ...

टीसीएस इनक्विझिटिव्ह २०२६ च्या पुणे फेरीचे विजेतेपद दिल्ली पब्लिक स्कूलने पटकावले देशभरातील तरुण प्रतिभावंतांना एकत्र आणणारा टीसीएसचा आघाडीचा क्विझ उपक्रम बुद्धिमत्ता, कल्पकता आणि ज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देतो

पुणे, २९ जुलै २०२६: माहिती तंत्रज्ञान सेवा, कन्सल्टिंग आणि व्यवसायांसाठी उपाययोजना देणारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) (BSE: 532540, NSE: TCS) आयोजित केलेल्या, टीसीएस इनक्विझिटिव्ह २०२६ ची पुणे फेरी अतिशय उत्साहात पार पडली. या चुरशीच्या स्पर्धेमध्ये जलद उत्तरे देण्याच्या क्षमता आणि प्रभावी ज्ञानाचे प्रदर्शन करत दिल्ली पब्लिक स्कूलचे श्रेयस ठाकूर आणि रोहित आचार्य यांनी पुणे फेरीचे विजेतेपद पटकावले. शहरातील समृद्ध शैक्षणिक संस्कृतीचे दर्शन घडवत, या विद्यार्थ्यांनी अप्रतिम सांघिक कामगिरी आणि सखोल ज्ञानाच्या जोरावर ‘टीसीएस इनक्विझिटिव्हच्या राष्ट्रीय महाअंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे, जिथे ते देशभरातून निवडल्या गेलेल्या इतर विजेत्या संघांशी स्पर्धा करतील.

 

 

 

यंदाच्या पुणे फेरीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील ४८ शाळांमधील तब्बल ३२६ हून अधिक संघांनी यात भाग घेतला होता. यावेळी ‘आयसर’चे (IISER) व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अरविंद ए. नातू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या वतीने टीसीएस पुणेचे रिजन हेड श्री प्रसाद एम. शास्त्री यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

 

 

 

इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली असलेली ही स्पर्धा खऱ्या अर्थाने ज्ञान आणि मनोरंजनाचा अनोखा संगम ठरली. या स्पर्धेत शिक्षण, मनोरंजन, क्रीडा जगतासह बिझनेस ट्रेंड्स, जाहिरात क्षेत्र आणि सोशल मीडिया अशा वैविध्यपूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला होता. यंदाच्या क्विझमध्ये ‘स्टेम’ (STEM) म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला होता, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, ऑटोमेशन, बायोमेट्रिक्स आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतील घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आला.

 

 

 

टीसीएस पुणेचे रिजन हेड श्री प्रसाद एम. शास्त्री म्हणाले, “टीसीएस इनक्विझिटिव्ह देशातील तरुण प्रतिभावंतांमधील अफाट प्रतिभा, कुतूहल आणि क्षमता सातत्याने प्रदर्शित करत आहे. ही स्पर्धा ज्ञानाच्या पलीकडे जाऊन, विद्यार्थ्यांना चिकित्सकपणे विचार करण्यास, वेगाने जुळवून घेण्यास आणि शिकण्याची आजीवन आवड जोपासण्यास प्रेरित करते. स्पर्धक स्वतःला आव्हान देत आहेत, विविध संकल्पना शोधत आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला आत्मविश्वास व कल्पकतेने सामोरे जात आहेत, हे पाहणे उत्साहवर्धक आहे. टीसीएसमध्ये आमचा असा विश्वास आहे की, पुढील पिढीचे इनोव्हेटर्स आणि लीडर्स तयार करण्यासाठी हे गुण आवश्यक आहेत. पुणे संघ आपल्या शहराच्या आकांक्षा घेऊन उपांत्य फेरीत जात असताना आम्ही त्यांना प्रत्येक यशासाठी शुभेच्छा देतो आणि इनक्विझिटिव्ह ज्या उत्कृष्टतेच्या भावनेचा गौरव करते, ते त्याचे उत्तम उदाहरण ठरावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो.”

 

 

 

‘टीसीएस इनक्विझिटिव्ह’चे हे २८ वे वर्ष आहे. आता हा भारतातील एक प्रतिष्ठित आंतर-शालेय क्विझ प्लॅटफॉर्म मानला जाऊ लागला आहे. असा प्लॅटफॉर्म जो विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांना नवीन कल्पना शोधण्यासाठी, त्यांचे दृष्टिकोन रुंदावण्यासाठी आणि त्यांच्या सभोवतालच्या जगाविषयी सखोल समज विकसित करण्यासाठी प्रेरित करत आहे.

 

 

 

२०२६ ची ही आवृत्ती पुणे, इंदूर, बेंगळुरू, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, भुवनेश्वर, कोची, कोलकाता आणि मुंबई येथे आयोजित केली जात आहे, ज्याची सांगता राष्ट्रीय अंतिम फेरीने होईल; जिथे देशातील सर्वात हुशार तरुण क्विझर्स ‘टीसीएस इनक्विझिटिव्ह नॅशनल चॅम्पियन २०२६’ या बहुमानित विजेतेपदासाठी स्पर्धा करतील.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments