Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedकृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा मानवी बुद्धिमत्तेची भविष्यात अधिक गरज; ज्ञान प्रसाद ग्लोबल विद्यापीठाचे मानसशास्त्र...

कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा मानवी बुद्धिमत्तेची भविष्यात अधिक गरज; ज्ञान प्रसाद ग्लोबल विद्यापीठाचे मानसशास्त्र अभ्यासक्रम घडवत आहेत उद्याचे मानसिक आरोग्य तज्ज्ञ

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वेगाने विकसित होत असली, तरी मानवी भावना, वर्तन आणि मानसिक आरोग्य समजून घेण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेलाच भविष्यात अधिक महत्त्व राहणार आहे. मानसिक आरोग्य, भावनिक स्वास्थ्य याविषयी जागरूकता वाढत असताना प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञांची मागणी देशभरात आणि जगभरात झपाट्याने वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन ज्ञानप्रसाद ग्लोबल विद्यापीठ (DPGU) डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी च्या स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स मध्ये विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख आणि भविष्यकालीन गरजांनुसार मानसशास्त्रीय शिक्षण दिले जात आहे.

विद्यापीठामार्फत बी.एस्सी. (ऑनर्स) ,एम.एस्सी. आणि पीएच.डी. मानसशास्त्र हे अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचार, नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये आणि व्यावसायिक क्षमता विकसित करण्यावर भर दिला जातो. अभ्यासक्रमात सैद्धांतिक शिक्षणासोबतच केस स्टडीज, मानसशास्त्रीय चाचण्या, संशोधन प्रकल्प, इंटर्नशिप आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद यांचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो.

यामधे मानसिक आरोग्य सेवा, क्लिनिकल व समुपदेशन मानसशास्त्र, मानव संसाधन (HR), संशोधन व अध्यापन, समुदाय आरोग्य सेवा तसेच संस्थात्मक विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या व्यापक संधी उपलब्ध होत आहेत. मानसिक आरोग्य आणि कार्यस्थळावरील मानसशास्त्राबाबत वाढत्या जागरूकतेमुळे या क्षेत्रातील व्यावसायिकांची मागणी देखील सातत्याने वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

याबाबत ज्ञान प्रसाद ग्लोबल विद्यापीठाचे प्र.कुलपती डॉ. सोमनाथ पी. पाटील यांनी मत व्यक्त करत असताना“तंत्रज्ञान जगात आमूलाग्र बदल घडवत असले, तरी मानवी वर्तन समजून घेण्याचे महत्त्व अधिक वाढत आहे असे प्रतिपादन केले . तसेच मानसशास्त्र हे केवळ समुपदेशनापुरते मर्यादित राहिलेले नाही; ते आरोग्य, शिक्षण, कॉर्पोरेट नेतृत्व, सार्वजनिक धोरणे आणि समाजविकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ज्ञान प्रसाद ग्लोबल विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही वैज्ञानिक ज्ञान, सहानुभूती, नैतिक जबाबदारी आणि व्यावहारिक कौशल्यांचा समतोल साधणारे व्यावसायिक घडविण्यास कटिबद्ध आहोत असे मत व्यक्त केले . आमचा मानसशास्त्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना समाजात अर्थपूर्ण बदल घडविण्यास सक्षम बनवत आहे .

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या मते भविष्यातील मानसशास्त्रज्ञांकडे शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यावहारिक कौशल्ये यांचा समतोल असणे आवश्यक आहे. संशोधनाधारित शिक्षण, आंतरशाखीय सहकार्य आणि उद्योग क्षेत्राशी सातत्यपूर्ण संवाद याद्वारे विद्यार्थ्यांना मानवी वर्तनाचा वैज्ञानिक, वैद्यकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची संधी दिली जाते.

मानसिक आरोग्य क्षेत्रातील वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर ज्ञान प्रसाद ग्लोबल विद्यापीठ पुणे , स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स हे पदवीपासून ते पीएच. डी .पर्यंतचा शैक्षणिक प्रवास उपलब्ध करून देत असून, विद्यार्थ्यांना सक्षम मानसशास्त्रज्ञ, संशोधक, समुपदेशक आणि वर्तनतज्ज्ञ म्हणून घडवत समाजाच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्यासाठी तयार करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments