Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedनागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात

नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विदर्भाचा दोन दिवसीय झंझावाती दौरा करत संघटनात्मक बैठकांच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीला वेग दिला. त्यांच्या या दौऱ्यानंतर आता भाजपची संघटनात्मक यंत्रणा नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे.

या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागपूर ग्रामीण (रामटेक), चंद्रपूर महानगर व ग्रामीण, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर महानगर, काटोल आणि वर्धा या संघटनात्मक जिल्ह्यांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये संघटनात्मक बांधणी, निवडणूक नियोजन आणि कार्यपद्धतीचा आढावा घेत चव्हाण यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने निवडणूक लढवण्याचे मार्गदर्शन केले. चंद्रपूरमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान ब्रह्मपुरी येथील, १९८० पासून पक्षकार्यासाठी समर्पित असणाऱ्या प्रा. शेख सर यांचा चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. “प्रा. शेख सर यांच्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते हे भाजपा परिवाराचे खरे आधारस्तंभ आहेत. अशा निष्ठावंत ज्येष्ठांच्या संघर्षातूनच आज पक्षाचा हा भव्य वटवृक्ष साकार झाला आहे.” असे यावेळी रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

या दौऱ्यादरम्यान रामटेकचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, आ. कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया, माजी आ. अतुल देशकर, ज्येष्ठ नेते किसन नागदेवे, माजी आ. कृष्णा गजभिये आणि आ. विनोद अग्रवाल यांच्या निवासस्थानी/कार्यालयाला सदिच्छा भेटी देत रविंद्र चव्हाण यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला.

या दौऱ्यात मंत्री डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री तथा पालकमंत्री पंकज भोयर, प्रदेश सरचिटणीस आ. संजय कुटे, आ. संजय भेंडे, आ. प्रवीण दटके, आ. कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया, आ. किशोर जोरगेवार, आ. करण देवतळे, आ. देवराव भोंगळे, आ. चैनसुख संचेती, आ. अरुण लखाणी, आ. परिणय फुके, आ. विनोद अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, आ. अविनाश ब्राह्मणकर यांच्यासह माजी खासदार हंसराज अहिर, सुनील मेंढे, माजी आमदार व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

सलग संघटनात्मक बैठका, वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधल्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या निवडणूक तयारीला नवी गती मिळाली. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्याने विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षकार्यासाठी स्पष्ट दिशा व प्रेरणा मिळाली असून संघटनेत नवा उत्साह, ऊर्जा आणि विजयाचा निर्धार संचारला आहे.

quote –

“आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात विदर्भात विकासाची गंगा प्रवाहित झाली आहे. नागपूर ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्यभूमी असून विदर्भ हा भाजपचा भक्कम बालेकिल्ला आहे. या दौऱ्यात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि विजयाचा आत्मविश्वास दिसला. नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी आम्ही सर्व ताकदीनिशी सज्ज आहोत. आमचाच विजय होईल, याचा पूर्ण विश्वास आहे.”

रविंद्र चव्हाण

प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments