Wednesday, November 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडियाकडून शीतल देवी यांना ह्युंदाई बेयॉन कार प्रदान करून गौरव

ह्युंदाई मोटर इंडियाकडून शीतल देवी यांना ह्युंदाई बेयॉन कार प्रदान करून गौरव

 

 

गुरुग्राम | २५ नोव्हेंबर २०२६: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) तर्फे आज कंपनीच्या ब्रँड ॲम्बेसेडर, जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाची पॅराआर्चर आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या शीतल देवी यांना ह्युंदाई बेयॉन कार प्रदान करून गौरविण्यात आले. जागतिक क्रीडा क्षेत्रातील त्यांची उल्लेखनीय कामगिरी आणि भारतीय क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान करण्यात आला.

 

भारताच्या सर्वाधिक प्रेरणादायी खेळाडूंपैकी एक असलेल्या शीतल देवी यांनी आपल्या असामान्य जिद्द, दृढनिश्चय आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पॅरालिम्पिक पदक, आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमधील सहा पदके आणि अनेक जागतिक विक्रम अशी त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. यामुळे भारतातील सर्वाधिक यशस्वी खेळाडूंपैकी एक म्हणून त्यांचे स्थान अधोरेखित झाले आहे.

 

शीतल देवी यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय यशाबद्दल तसेच सर्वसमावेशकता, सक्षमीकरण आणि उत्कृष्टतेचा संदेश देत देशभरातील नवोदित खेळाडूंना प्रेरणा देण्याच्या त्यांच्या योगदानाबद्दल कौतुकाची पोचपावती म्हणून ह्युंदाई बेयॉन कार प्रदान करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments