या नवीन एमएक्स ओरिजिनलचा प्रीमियर 18 ऑगस्ट 2026 रोजी प्राइम व्हिडिओवर; दर मंगळवारी तीन नवीन एपिसोड्स प्रदर्शित होणार
Promo Link: https://youtu.be/IOZ7F1qpPgs
मुंबई, भारत – 14 ऑगस्ट 2026 : मनात साचलेल्या भावना मैत्रिणींसमोर मोकळ्या करायच्या आहेत? फॅशनचा एखादा प्रश्न सोडवण्यासाठी मदत हवीय किंवा थोडा आत्मविश्वास वाढवायचाय? वी गॉट यू, गर्ल! एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी भारतातील सर्वात मोठी स्ट्रीमिंग सेवा असलेल्या प्राइम व्हिडिओने ‘वी गॉट यू, गर्ल’ या एमएक्स ओरिजिनल सीरिजची घोषणा केली आहे. अभिनेत्री बरखा सिंग आणि आयशा अहमद या सीरिजचे सूत्रसंचालन करणार आहेत. महिलांच्या व्यक्तिमत्त्वाचा उत्सव साजरा करणाऱ्या या 15 एपिसोड्सच्या शोमध्ये तज्ज्ञांचा सल्ला, मैत्रिणींमधील हलक्याफुलक्या गप्पा आणि प्रत्यक्ष आयुष्यातील मेकओव्हर्स यांची सांगड घालण्यात आली आहे. महिलांना स्वतःचे व्यक्तिमत्त्व कायम ठेवून आपल्यासाठी नेमके काय योग्य आहे, हे ओळखण्यास मदत करणे हा या शोचा उद्देश आहे.
दर मंगळवारी असे एकूण पाच आठवडे तीन नवीन एपिसोड्स प्रदर्शित करण्यात येणार आहेत. ‘वी गॉट यू, गर्ल’च्या प्रत्येक एपिसोडमध्ये एका वेगळ्या महिलेची स्टाइल, ब्युटी किंवा आत्मविश्वासाशी संबंधित समस्या आणि त्यावर ती कशा प्रकारे मात करते, हे पाहायला मिळणार आहे. बरखा आणि आयशासोबत एटिकेट अँड ट्रान्सफॉर्मेशन कोच माणिक कौरही या शोमध्ये सहभागी होणार आहेत. त्वचेचा अंडरटोन, केसांचा पोत आणि व्यक्तीला शोभणारे रंग यांपासून व्यक्तिमत्त्व, जीवनशैली आणि बजेटपर्यंत विविध बाबींचा विज्ञान आणि तर्काच्या आधारे विचार करण्यात येणार आहे. त्याला गर्ल-स्क्वॉड एनर्जीची मजेदार जोड देत या तिघी प्रत्येक महिलेला तिच्या आवडीचा मेकओव्हर निवडण्यास मदत करणार आहेत.
या प्रवासाचा अंतिम टप्पा म्हणजे मेकओव्हर असला, तरी तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवासच सर्वाधिक मजेदार आहे. ‘हे माझ्यासाठी योग्य आहे असं मला वाटत नाही’पासून ‘अरे, मी हे याआधी का करून पाहिलं नाही?’पर्यंत प्रत्येक एपिसोडमध्ये मनमोकळी मतं, अनपेक्षितपणे लागलेले नवे शोध आणि हलक्याफुलक्या गप्पा पाहायला मिळणार आहेत. तज्ज्ञांचा सल्ला आणि मैत्रिणींच्या सहज गप्पांची सांगड घालून ‘वी गॉट यू, गर्ल’मध्ये ब्युटी आणि स्टाइलशी संबंधित दैनंदिन प्रश्नांना आत्मविश्वास आणि स्वतःला नव्याने ओळखण्याच्या मजेदार आणि सहज नाते जोडता येईल अशा प्रवासात बदलण्यात आले आहे. कारण कधी कधी तुम्हाला फक्त तुमच्या मैत्रिणींचीच गरज असते.
या सीरिजविषयी बरखा सिंग म्हणाली, “आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही क्षण येतात, जेव्हा आपल्याला फक्त आपल्या मैत्रिणींची गरज असते. मग तुम्ही काहीतरी नवीन सुरू करत असाल, स्वतःबद्दल थोडा संभ्रम वाटत असेल किंवा फॅशनशी संबंधित एखादा प्रश्न पडला असेल! त्यामुळेच ‘वी गॉट यू, गर्ल’मध्ये काम करताना मला खूप मजा आली. आयशा आणि माझ्यातील केमिस्ट्री अतिशय सहज आणि आपुलकीची आहे. त्यामुळे ही सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकही आमच्या या विश्वाचा भाग होणार आहेत, याचा मला खूप आनंद आहे.”
आयशा अहमद म्हणाली, “मला ‘वी गॉट यू, गर्ल’ची सर्वांत आवडलेली गोष्ट म्हणजे या शोमधील प्रसंग आपल्यापैकी प्रत्येकाला आपलेसे वाटतात. आपण सगळ्यांनीच कधी ना कधी आपल्या वॉर्डरोबकडे पाहून ‘माझ्याकडे घालायला काहीच नाही’ असा विचार केला असेल किंवा एखादी गोष्ट करून पाहिल्यानंतर ती आपल्याला योग्य का वाटत नाही, असा प्रश्न पडला असेल. अशा दैनंदिन प्रश्नांना या शोमध्ये मजेदार स्वरूप देण्यात आले आहे आणि त्याचबरोबर प्रत्यक्षात वापरता येईल असा सल्लाही देण्यात येतो. या शोमधील मेकओव्हर प्रत्येक महिलेचे व्यक्तिमत्त्व, तिची जीवनशैली आणि तिला कशात सर्वाधिक कम्फर्टेबल वाटते, हे लक्षात घेऊन करण्यात येतात, ही बाबही मला खूप आवडते. बरखा आणि मी या शोमध्ये गर्ल-गँग एनर्जी आणताना खूप धमाल केली. आता बाहेर असलेल्या आमच्या मोठ्या गर्ल गँगची या अप्रतिम महिलांशी भेट कधी होते, याची मला उत्सुकता आहे.”
‘वी गॉट यू, गर्ल’ ही सीरिज केवळ प्राइम व्हिडिओवर आणि ‘एमएक्स प्लेयर बाय प्राइम व्हिडिओ या नव्या ओळखीसह सादर करण्यात आलेल्या एमएक्स प्लेयरच्या अँड्रॉइड ॲपवर मोफत स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे. दर मंगळवारी तीन नवीन एपिसोड्स प्रदर्शित करण्यात येणार असून, मोबाइल डिव्हाइसेस, कनेक्टेड टीव्ही, ॲमेझॉन शॉपिंग ॲप, प्राइम व्हिडिओ आणि फायर टीव्हीवर ही सीरिज पाहता येणार आहे.


